सध्या अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चर्चा प्रचंड होत आहे. ही वेबसिरीज 20 मे रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड अंदाजात दिसली. यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया आल्या. आता स्वतः तेजस्विनीने या अभिनयाबद्दल अनुभव सांगितला आहे.
‘रानबाजार’ या वेबसिरीजमध्ये तेजस्वीनीने 30 सेकंदाचा किसिंग सीन केला आहे. याविषयी सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. आता तिने एका वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आपला अनुभव सांगितला आहे. तिने 30 सेकंदाच्या मोठ्या कालावधीच्या किसिंग सीनविषयी खुलासा केला आहे.
ती म्हणाली कलाकाराने वैविध्यपूर्ण भूमिका केल्या पाहिजेत. त्या स्वीकारल्या पाहिजेत. एक्सपेरिमेन्ट करत राहिला पाहिजे. मी जर एकच भूमिका करत राहिले तर तुम्हांला माझ्यातील वैविध्य दिसणार कसं? वेबसिरीजचा पहिला टिझर आला तेव्हा लोकांनी ट्रोल केले पण मी ज्यांनी चांगल्या कमेन्ट केल्या त्यांच्याकडे पाहिले. असे तेजस्विनी म्हणाली.
तसेच म्हणाली, माझ्या आयुष्यासाठी जे चांगलं आहे ते मी घेते. ट्रॉलर्स विषयी माझं काही म्हणणं नाही, पण हे गिमिक्स असतं, आणि हे सांगून लोकांना कळणार नाही. हे फक्त फिल्मी लोकांना माहिती असतं. आम्हांला फक्त माहिती असे सीन कसे करतात. शूटिंग दरम्यान आम्ही कपडे घातलेले असतात अशी ती म्हणते.
पुढे म्हणते, आपल्याकडील प्रेक्षकांना मराठीत असे बोल्ड सीन पाहण्याची सवय नाही. मराठीतून हे सारे सीन पाहताना त्यांचा चष्मा बदलतो. त्यात मराठी मुलीने हे सारं केले याबद्दल ते अधिक रियाक्ट होतात. अरे बापरे ही मुलगी असे कसे करू शकते असे म्हणतात, असे तेजस्विनी म्हणते.
तेजस्विनी पंडितनं तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत खूप विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तिनं साकारलेल्या ‘सिंधुताई सपकाळ’ भूमिकेनं तर तिच्या नावावर अनेक पुरस्कारांची नोंद केली. गेल्या काही वर्षात अनुभवागणिक सिनेमांची निवड करताना तेजस्विनी बदलताना दिसली.