Share

तिन्ही खानसोबत काम करून कसं वाटलं? माधुरी दिक्षीत म्हणाली, तिघांमध्ये सगळ्यात खोडकर..

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकतेच ‘द फेम गेम’मधून डिजिटल डेब्यू केले आहे. 90 च्या दशकात माधुरीने बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांसोबत काम केले आहे. तिने अलीकडेच एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार आणि सैफ अली खान यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला.(How did you feel working with the three Khans)

Shah Rukh Khan Madhuri Dixit Devdas Scene Recreate Video Viral Jhalak Dikhlaja Show | जब शाहरुख खान और माधुरी दीक्षित ने इस ट्विस्ट के साथ किया देवदास का आइकॉनिक सीन रीक्रिएट ...

शाहरुख खानबद्दल (Shah Rukh Khan) बोलताना माधुरी म्हणाली, शाहरुख खूप विनम्र व्यक्ती आहेत, तो नेहमी विचारतो की, तुम्ही कंफर्टेबल आहात का? तसेच तो इतरांचीही खूप काळजी घेतो. माधुरीने शाहरुखसोबत ‘दिल तो पागल है’, ‘कोयला’, ‘देवदास’ आणि ‘अंजाम’ सारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे.

is madhuri dixit pay much more than salman khan for film hum aapke hain kaun

माधुरीने सलमान खानला (Salman Khan) खूप खोडकर म्हटले आहे. माधुरीच्या म्हणते की तो कमी बोलतो, पण खूप खोडकर आहे. त्याच्याकडे स्वॅग आहे. सलमान खान आणि माधुरीची जोडी प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. या दोघांनी ‘हम आपके है कौन’ आणि ‘साजन’ सारखे चित्रपट केले आहेत.

Madhuri Dixit's Quotes on Twitter: "Mads, Akshay kumar and saif ali khan. #Aarzoo https://t.co/Mfc4VGoOUu" / Twitter

अक्षय कुमारबद्दल माधुरी म्हणाली की, तो खूप प्रेरणा देतो, त्याला नेहमी त्याच्या कामाने स्वतःला सिद्ध करायचे असते. सेटवर तो प्रॅक्टिकल जोकर होता. सैफबद्दल बोलताना माधुरी म्हणाली की, त्याचे वन-लाइनर खूपच मजेदार असतात. माधुरीने 1999 मध्ये अक्षय आणि सैफसोबत आरजू या चित्रपटात काम केले होते.

माधुरी ‘कमबॅक’ बद्दल बोलताना म्हणाली की, मी चित्रपटसृष्टी कधीही सोडली नाही. एक-दोन वर्षांच्या गॅपनंतर जेव्हा मी चित्रपट केला तेव्हाही मला सांगण्यात आले की मी पुनरागमन करत आहे. बऱ्याच वेळा एकले की, मी चित्रपटसृष्टीत परतणार आहे, पण मी ही चित्रपटसृष्टीत कधीच सोडली नाही.

लग्नानंतर मी देवदास (2002) या चित्रपटात काम केले. अभिनेत्रीने सांगितले की, मुलगा झाला तेव्हा काही वर्षे काम केले नाही. ती म्हणाली की, जेव्हा एखादा हीरो असे करतो तेव्हा असे म्हटले जात नाही. आमिर खानबद्दल बोलताना माधुरी म्हणाली, कधीकधी आमिर खानचे चित्रपट दोन-तीन वर्षे प्रदर्शित होत नाहीत. पण त्याने पुनरागमन केल्याचे कोणीही म्हणत नाही.

महत्वाच्या बातम्या-
तेव्हा लहाणपणी लग्न व्हायची तुमचं अजून झालं नाही, राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला
राज्यपालांनी लोकशाहीचा गळा घोटला; आघाडी विरोधात कोर्टात जाणाऱ्या भाजपलाच कोर्टाने झापले
PHOTOS: या आहेत भोजपुरीच्या टॉप १० ग्लॅमरस अभिनेत्री; सनी लिओनी, नोरा फतेहीही पडतील फिक्या
सोनाक्षी नाही, तर ‘या’ अभिनेत्रीशी ठरलं होतं सलमानचं लग्न, पत्रिकाही छापल्या होत्या; पण पुढे

 

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now