Share

आयुष्यातली पहिली निवडणूक शरद पवार कसे जिंकले?; त्यांच्या प्रतिस्पर्ध्यानेच सांगितला हा खास किस्सा

कॉलेज डे’जमधील शरद पवारांचे खास मित्र विठ्ठल मणियार यांनी शरद पवारांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. शरद पवारांशी असलेल्या विशेष मैत्रीबद्दल ते म्हणतात की, हे मैत्र आयुष्य उजळवणारं आहे. मैत्रीदिनानिमित्ताने त्या दोघांच्या मैत्रीबद्दल जाणून घेऊया. (How did Sharad Pawar win the first election in his life?)

विठ्ठल मणियार सांगतात की, ‘मी आणि पवार साहेब १९५८ साली पहिल्यांदा भेटलो. मी शहरी भागातला पुण्यातून आलेलो आणि बारामतीच्या छोट्याशा भागातून पवार साहेब आले होते. सुरुवातीलाच कॉलेजमध्ये विद्यार्थी प्रतिनिधीची निवडणुका जाहीर झाली.

‘मी पुण्यातला..त्यातून बरेचसे विद्यार्थी मित्र माझ्या ओळखीचे होते. त्यामुळे मी आत्मविश्वासाने निवडणूक लढवण्याचे ठरवले. त्यावेळी माझ्या प्रतिस्पर्धीचे नाव होते “शरद पवार”. मी स्वतःचा फार प्रचार केला नाही. तशी मला गरज वाटली नाही.’

पण शरद पवार विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न, त्यांची गरज याबद्दल बोलत राहिले. शेवटी निवडणुकीचा निकाल आला. ८० टक्के मतांनी त्यांचा विजय झाला. नाही म्हटलं तरी त्या नकळत्या वयात पराभवाची सल माझ्या मनात होती.

पण पवारसाहेब स्वतः माझ्याशी बोलायला आले. निवडणूक झाली, आता काम करू, असे म्हणाले. हा किस्सा सांगत पुढे मणियार म्हणाले, तेव्हापासून जुळलेल्या मैत्रीच्या तारा अजून घट्ट आहेत. ६४ वर्षे मागे वळून पाहताना वाटतं की, जो माणूस कोणतीही निवडणूक हरला नाही. तो माझ्या विरोधात पहिली निवडणूक जिंकला होता. त्या अर्थाने माझं नाव इतिहासात कोरलं गेलय.

पुढे त्यांनी राजकारणाबद्दल शरद पवारांची शिस्त त्यांचा वक्तशीरपणा याबद्दल सुद्धा कौतुक केले. आणि म्हणाले की, आम्ही मैत्रीत अनेक प्रसंग अनुभवले. पण साहेबांचा कॅन्सर विरोधातला लढा मी कधीच विसरू शकत नाही. घाबरणं दूरच पण स्थितप्रज्ञता काय असते, हे मी तेव्हा पाहिलं, असं मणियार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-
सर्व भारतीय व्हॉट्सअप डीपीवर तिरंगा ठेवतीलच, पण देशाच्या जी’डीपीचे काय?
मुस्लिम विद्यार्थ्यांनी जिंकली चक्क रामायणावरील ऑनलाइन प्रश्नमंजुषा; सर्वत्र त्यांचीच चर्चा
‘अबू आझमी सारख्या माणसाला महाराष्ट्राच्या बाहेर फेकले पाहिजे’; संभाजीराजेंना संताप अनावर

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now