मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्धार केल्यामुळे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा चांगलेच चर्चेत आले आहेत. भोंग्याच्या वादावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एकेकाळी अभिनेत्री म्हणून ओळख असणाऱ्या नवनीत राणा आज राजकिय भूमिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. आज आपण याच नवनीत राणांविषयी जाणून घेणार आहोत. नवनीत राणा या मूळच्या मुंबईच्या आहेत. बारावीनंतर त्यांनी मॉडलींग क्षेत्रात पाऊल ठेवले.
त्यांचे काम आणि सौंदर्य पाहून त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. नवनीत राणा यांनी कन्नड, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटात काम केले आहे. त्यामुळे त्या राजकियसोबत कलाक्षेत्रात देखील सुप्रसिद्ध आहेत. आपल्याकडे कोणताही राजकिय वारसा नसताना राणा यांनी 2014 झाली राजकीय क्षेत्रात पाऊल ठेवले.
आपल्या स्वभावामुळे तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्याची इच्छा असल्यामुळे राणा आजवर राजकिय वर्तुळात टिकून राहिल्या. त्या सुरुवातीपासून बाबा रामदेव यांच्या शिष्या राहिल्या आहेत. रामदेव बाबाकडे जात असतानाच त्यांची ओळख रवी राणा यांच्याशी झाली.
रवी राणा यांच्याशी मैत्री वाढल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. नवनीत राणा यांनी सामूहिक विवाहात रवी राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली. या विवाहसोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाबा रामदेव उपस्थित होते.
खरे तर, २०१४ मध्ये नवनीत राणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेसाठी उभ्या राहिल्या. परंतु यामध्ये त्यांना अपयश आले. पुढे जात 2019 मध्ये नवनीत राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थनामुळे खासदार झाल्या. मात्र यावेळी त्यांनी पलटी खात सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये प्रवेश मिळविला.
आज नवनीत राणा आपल्याला सत्तेत आणणाऱ्या पक्षाविरोधातच उभ्या राहिल्या आहेत. भोंग्याच्या वादावरून त्या महाविकास आघाडीवर टीका करताना दिसत आहेत. नवनीत राणा यांनी ‘चेतना’ (२००५), ‘जगपति’ (२००५), ‘गुड बॉय’ (२००५), आणि ‘भूमा’ (२००८) अशा अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यांना मराठी, पंजाबी, हिंदी, तेलुगू आणि इंग्रजी भाषा येतात.
महत्वाच्या बातम्या
जातीयवादाचा कळस! दोन दलित तरुणांची निर्घृण हत्या, पळून जाऊ नये म्हणून जाळले पाय
शाहिद कपूरच्या ‘या’ कृतीने संतापले चाहते, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘जर्सी’वर बंदीची मागणी
अभिनयात यश मिळाले नाही म्हणून सरफराज करतोय ‘हे’ काम, वडील कादर खान यांचे नाव केले रोशन
मुंबईचा सलग सातवा पराभव पाहून मैदानावरच रडू लागला रोहित शर्मा? खेळाडू झाले निराश