Share

२८ वर्षीय तरुणीचा ६६ वर्षीय ‘या’ भारतीय क्रिकेटवर जीव कसा जडला? भन्नाट आहे लव्हस्टोरी

टीम इंडियाचे माजी खेळाडू अरुण लाल यांनी वयाच्या 66 व्या वर्षी दुसरं लग्न केले. त्यांनी जिच्या सोबत लग्न केले ती 38 वर्षांची आहे. तिचं नाव बुलबुल साहा आहे. 2 मे ला त्यांनी लग्न केले. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊन सध्या त्यांच्या लग्नाबद्दल चर्चा होत आहे.

अरुण लाल हे वयाच्या 66 व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले. त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने 38 वर्ष लहान असलेल्या बुलबुल साहासोबत सोमवारी म्हणजे 2 मे रोजी लग्न केलं. त्यांचं लग्न कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये पार पडलं. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

या फोटोत अरुण लाल आणि बुलबुल साहा हे किस करताना दिसत आहेत. या दोघांच्या वयात 28 वर्षांचा फरक असल्याने सध्या सोशल मीडियावर याच मुद्यावरून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. अनेकांना त्यांच्या प्रेमाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता देखील आहे. त्याच बद्दल आपण जाणून घेऊ.

अरुणची दुसरी बायको बुलबुल साहा ही व्यवसायाने शाळेतील शिक्षिका आहे, जी जवळपास 8 वर्षांपासून कोलकाता येथील एका खाजगी शाळेत शिकवत आहे. बुलबुल साहाने एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘आम्ही दोघे एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून भेटलो. आम्ही एका पार्टीला गेलो जिथे आम्ही एकमेकांशी नेहमीप्रमाणे बोलू लागलो. मात्र, त्यानंतर आम्ही दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलो’.

तसेच म्हणाली, अरुण हा अतिशय जीवंत माणूस आहे आणि त्याला निसर्ग, प्राणी आणि गरीब लोकांवर खूप प्रेम आहे. आम्ही कुठेतरी बाहेर गेलो की, तो भिकारी दिसला की, त्यांना पैसे देतो. त्याच्याकडे पैसे नसतील तर तो माझ्याकडून पैसे घेतो. ही त्याची गोष्ट मला प्रचंड आवडली.

अरुण एक दयाळू माणूस आहे आणि तो निसर्गाच्या खूप जवळ आहे. हे कोणालाच माहीत नाही, परंतु त्यांनी जवळपास 5 हजार झाडे लावली आहेत. अरुणच्या या सर्व गोष्टींनी मला त्याच्याकडे आकर्षित केले आणि मी हळूहळू त्यांच्या प्रेमात पडले, असे बुलबुल साहा यांनी सांगितले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अरुण लाल यांच्या पहिल्या बायकोनेच त्यांना बुलबुलसोबत लग्न करण्याची परवानगी दिली असेही तिनं सांगितले.

खेळ मनोरंजन

Join WhatsApp

Join Now