निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यामधील संघर्ष वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्हीं पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका करत आहेत. राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघाले आहे.
सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलं आहे. ‘बारामतीचा गडी एवढा हुशार कसा? शरद पवार यांच्यामध्ये नक्की कोणते स्पेअर पार्ट टाकले आहेत? हे मी वर गेल्या-गेल्या ब्रह्मदेवाला विचारणार आहे,’ असा खोचक टोला सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे.
विधानपरिषदेचे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार किरीट सोमय्या, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.
सदाभाऊ खोत यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या आमदारनिधीतून आटपाडी तालुक्यात विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी सदाभाऊ खोत उपस्थित होते, यावेळी त्यानी राष्ट्रवादीला पुन्हा एकदा डिवचलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना खोत म्हणाले आहेत की, नुकतीच ब्राह्मण समाजाने शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर पवारांनी ट्वीट करून दुसऱ्यांच्या आरक्षणाला तुम्हाला विरोध करता येणार नाही, असं ब्राह्मण समाजाला सांगितलं. आम्ही असं म्हटलंच नाही, हे ब्राह्मण समाज आता ओरडून सांगत आहे.
बारामतीचा गडी कसा आला, हे आपण मेल्यावर ब्रह्मदेवाला विचारणार आहोत, मला वाटतं की हा गडी ब्रह्मदेवाला चुकवून खाली पळाला असेल. इतका बिलंदर माणूस राजकारणात कधीही मिळणार नाही, असं म्हणत खोत यांनी टोमणा मारला आहे. आता सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीकडून कोणती प्रतिक्रिया येणार हे पहावं लागणार आहे.
महत्वांच्या बातम्या:-
तारक मेहता का उल्टा चष्मा मधील दयाबेनने दिला बाळाला जन्म; दुसऱ्यांदा झाली आई
ज्ञानवापी प्रकरण : शरद पवारांचं मोठं विधान; वाचा काय काय म्हणाले…
मोठी बातमी! किर्तनकार इंदूरीकर महाराजांची प्रकृती बिघडली; किर्तनाचे सर्व कार्यक्रम रद्द






