Share

हरिपाठासाठी गेलेल्या 4 वर्षाच्या बलिकेसोबत घडला संतापजनक प्रकार, असह्य वेदना होत असल्यामुळे केली चौकशी अन्…

छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याठिकाणी मंदिरातून घराच्या दिशेने जाणाऱ्या एका ४ वर्षीय बालिकेवर बलात्कार करण्यात आला आहे.

याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे. पीडित बालिकेचे घर पंढरपूर येथील एका मंदिराच्या मागच्या बाजूला आहे.

ती मंदिरात हरिपाठासाठी गेली होती. तिची बहिणही तिच्यासोबत होती. पण मंदिरात गोंधळ घालत असल्यामुळे तिच्या बहिणीने तिला घरी पाठवले. ती मंदिराच्या बाहेर पडली त्याच वेळी आरोपी कंपनीतून त्याच रस्त्याने घरी परतत होता.

दरम्यान, यावेळी अंधाराचा फायदा घेत त्याने चिमकलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला आहे. चिमुकलीला वेदना होत असल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिची विचारपूस केल्यावर हा प्रकार समोर आला.

याबाबत घरच्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या घटनेने पंढरपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, चिमुकलीला असह्य वेदना होत असल्यामुळे ती तडफडत होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली असता हा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करण्यात सुरुवात केली. यानंतर हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. आरोपीला मोठी शिक्षा देण्याची मागणी सध्या होत आहे.

क्राईम

Join WhatsApp

Join Now