जयपूर | प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा हे त्याचे लग्न असते. प्रत्येकजण आपल्या लग्नाविषयी अनेक स्वप्न बघत असतो. आपल्याला लग्नासाठी मुलगी कशी हवी, प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील तिचा जोडीदार कसा असेल याचा विचार प्रत्येक मुलगी करत असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात घरच्यांच्या म्हणण्याने लग्न होत होते.
मात्र आता नव्या पिढीला प्रेम विवाह करण्यात जास्त रस असल्याचे दिसून येत आहे. मात्र अजूनसुद्धा काही ठिकाणी घरच्यांच्या पद्धतीने लग्न ठरवले जाते. मात्र हेच लग्न आता एक युवकाच्या जीवावर बेतल आहे. जयपूरमध्ये हा आगळीक प्रकार घडला आहे.
पत्नीमुळे वैतागलेल्या एका पतीने जयपूरमधील विश्वकर्मा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. पीडित पतीचे असे म्हणणे आहे कि, एकीकडे त्याची पत्नी त्याला खोट्या केसमध्ये अडकवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे तिचा प्रियकर त्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे. याच कारणामुळे हैराण झालेल्या पतीने आता थेट पोलीस स्टेशन गाठले आहे.
पीडित पतीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार १७ नोव्हेंबर २०२१ ला त्या दोघांचे लग्न झाले होते. हे लग्न कुटुंबीयांच्या आणि आमच्या दोघांच्या सहमतीने झाले होते. लग्नानंतर मधुचंद्राच्या रात्री जेव्हा तो आपल्या खोलीत पत्नीच्या जवळ गेला तेव्हा पत्नी रागात त्याला गेट आउट म्हणाली आणि तिथून निघून जाण्यास सांगितले.
त्यानंतर पत्नीने पतीसमोर या गोष्टीचा खुलासा केला की ती दुसऱ्याच युवकावर प्रेम करते. अशोक नावाच्या युवकावर माझे प्रेम असून, मी त्याचीच होणार असे ठाम मत पत्नीने पतीसमोर मांडले. तसेच तिने पुढे असेही सांगितले कि, घरच्यांनी जबरदस्ती माझे लग्न लावले आहे. हे ऐकून पतीला धक्काच बसला.
त्यानंतर त्याने ताबडतोब सासरच्या लोकांशी चर्चा केली. मात्र सासरकडच्या मंडळींनी मुलीला समजवायचे सोडून नवऱ्या मुलावरच आरोप करू लागले. पीडित पतीने पुढे असेही सांगितले कि, पत्नीचा प्रियकर अशोक याला समजावून आपल्या पत्नीपासून दूर राहाण्यास त्याने सांगितले होते. मात्र त्या प्रियकराने त्याचे काही ऐकले नाही.
इतकंच नाही तर अशोकने पीडित व्यक्तीला धमकीही दिली की पत्नीला कोणत्याही प्रकारे त्रास दिला किंवा तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, तर तुला जीवे मारेल. त्यानंतरहि पतीने पत्नीला वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने त्याचे काहीच ऐकले नाही. तर तिने खोट्या आरोपात अडकवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली.
पत्नीचा प्रियकरही पीडित व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देत आहे. एकदा अशोकने पीडित व्यक्तीच्या घरी येऊन त्याला मारहाणही केली होती. त्यानंतर तीन महिने हे सगळे सहन केल्यानंतर पीडित पतीने पोलिसांची मदत घेतली व तक्रार दाखल केली.
महत्वाच्या बातम्या:
मेट्रोच्या भोसरी स्टेशनचे नाव बदलण्याची पुणेकरांची मागणी; जाणून घ्या यामागचे हैराण करणारे कारण
रशियाची भारतला ‘ही’ भन्नाट ऑफर; मोदी सरकार धाडसी निर्णय घेत होकार देणार का?
महागाई वाढली असताना गरिबांनी जगायचं कसं? केंद्र सरकारवर सुप्रिया सुळे भडकल्या..
रशियाची भारतला ‘ही’ भन्नाट ऑफर; मोदी सरकार धाडसी निर्णय घेत होकार देणार का?