आयर्लंड (IRE) दौऱ्यावर टीम इंडियासाठी दीपक हुड्डा (Deepak Hooda) हा सर्वात मोठा गेम चेंजर ठरला आहे. त्याने या दोन डावांतून सर्वांना दाखवून दिले आहे की तो या रेसमध्ये खूप लांबपर्यंत आहे. त्याचबरोबर त्याने या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२२ साठीही आपली दावेदारी मजबूत केली आहे. दीपक हुड्डा आगामी काळात तीन बड्या खेळाडूंसाठी धोक्याचा ठरणार आहे आणि त्यांची जागाही हिसकावू शकतो.(Deepak Hooda, World Cup, Shreyas Iyer, Venkatesh Iyer, Suryakumar Yadav)
श्रेयस अय्यर:
श्रेयस अय्यर हा टीम इंडियाच्या महत्त्वाच्या फलंदाजांपैकी एक आहे, तो सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. काही काळापासून श्रेयस अय्यरला चांगली फलंदाजी करता आली नाही, मात्र आता दीपक हुड्डाचे शतक अय्यरसाठी धोक्याचे ठरले आहे. हुड्डा अशीच फलंदाजी करत राहिला तर श्रेयस अय्यरलाही संघाबाहेर जावे लागू शकते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे दीपक हुडा ओपनिंगपासून ते खालच्या फळीपर्यंत फलंदाजी करू शकतो, ही क्षमता फार कमी फलंदाजांमध्ये असते.
व्यंकटेश अय्यर:
सध्या वेंकटेश अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी झगडत आहे, दरम्यान दीपक हुड्डाने आपली क्षमता दाखवण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे व्यंकटेशला संघात स्थान मिळवणे अधिक कठीण होत आहे. व्यंकटेश अय्यरला गेल्या दोन मालिकांमध्ये एकदाही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही, तर दीपक हुड्डाने या मालिकेनंतर टीम इंडियातील आपले स्थान आणखी मजबूत केले आहे.
सूर्यकुमार यादव:
सूर्यकुमार यादव हा नेहमीच टीम इंडियाची पहिली पसंती राहिला आहे, पण २०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला अजून अनेक सीरीज खेळायच्या आहेत, त्यामुळे दीपक हुड्डाला सूर्यकुमार यादवला मागे टाकण्याची चांगली संधी आहे. आयर्लंडविरुद्ध दोन्ही सामन्यात सूर्यकुमार यादवला फलंदाजीची संधी मिळाली असली तरी त्याला अपेक्षेप्रमाणे फलंदाजी करता आलेली नाही.
दुसरीकडे, दीपक हुड्डाने या दोन सामन्यांमध्ये १५१.०० च्या सरासरीने १५१ धावा केल्या आहेत, ज्यात १ शतक आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेटही १७५.५८ राहिला आहे. दीपक हुड्डाच्या दमदार कामगिरीमुळे आता त्याचा T२० विश्वचषकात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दीपक हुड्डा गेल्या ८ महिन्यांपासून सतत धावा करत आहे.
प्रथम त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धावा केल्या, नंतर तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनऊ सुपर जायंट्ससाठी मजबूत फॉर्ममध्ये होता आणि आता तो आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या T२० मालिकेत धावा करण्याचं मशीन बनला आहे. गेल्या ८ महिन्यांत दीपक हुड्डाने जवळपास ९०० धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
विक्रमांचा धुमाकूळ! दीपक हुड्डा, ईशान किशनने केला मोठा विक्रम; रोहित शर्मा, गौतम गंभीरलाही टाकले मागे
पाच वर्षांपुर्वी सरबजितच्या बहिणीला दिलेले वचन रणदीप हुड्डाने केले पुर्ण, वाचून व्हाल भावूक
;त्या एका ओव्हरमुळे पालटले नशीब, दीपक हु्ड्डा अन् हार्दिक पांड्याने लिहीली विजयाची गाथा
साऊथला मागे टाकण्यासाठी सज्ज आहेत बॉलिवूडचे हे कलाकार, येणार एकामागून एक १८ चित्रपट