अजूनही अनेक ठिकाणी समाजात आंतरधर्मीय विवाहाला कडाडून विरोध केला जातो. यामुळे अनेक धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना हैदराबादमधून समोर येत आहे. मुस्लीम तरुणीशी लग्न केल्याने हिंदू तरुणाची भर चौकात हत्या करण्यात आली आहे.
मन सुन्न करणाऱ्या या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. याचबरोबर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. तर दुसरीकडे कुटुंबियांवर देखील दु: खाचा डोंगर कोसळला आहे. तर वाचा सविस्तर नेमकं घडलं काय?
ही धक्कादायक घटना हैदराबादमधील सरूरनगर घडली आहे. सुलतान आणि नागराज गेल्या 7 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन् त्यांनी लग्नगाठ बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला कडाडून विरोध होता.
त्यांच्या लग्नाला विरोध करण्याचे कारण म्हणजे दोघाचं धर्म वेगळे होते. अखेर कुटुंबियांच्या विरोधात जावून ३१ जानेवारी रोजी नागराजू आणि सुलतानाने पळून जाऊन लग्न केले. लाल दरवाजा परिसरातील आर्य समाज मंदिरात लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नानंतर सुलतानाने तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले.
मात्र सुलतानाने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध नागराजूसोबत लग्न केल्याचा राग सुलतानाच्या कुटुंबीयांना आला. आणि बुधवारी सुलतानाचा भाऊ आणि काही नातेवाईकांनी नागराजूवर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी सुलतानच्या पतीला लोखंडी रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली.
दरम्यान, या हल्ल्यात नागराजूचा जागीच मृत्यू झाला. काळजाचा ठोका चुकवणारी बाब म्हणजे पतीवर हल्ला होतं असताना ती ओरडत राहिली आणि पतीला सोडण्यासाठी त्या लोकांचे हातपाय जोडले पण कोणीही ऐकले नाही, असे सुलतानाने माध्यमांशी बोलताना सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
या शुक्रवारी रिलीज होणार ‘हे’ सुपरहिट चित्रपट, थ्रिल, रोमान्स आणि देशभक्तीचा लागणार तडका
जेलवारी वाईटच, प्रचंड त्रास होतोच, आणि मानसिक खच्चीकरण…; रुपाली पाटलांची राणा दाम्पत्यावर खास पोस्ट
कळव्यातील मुस्लिम बांधवांनी घालून दिला नवा आदर्श; स्वत:च उतरवले मशिदीवरील भोंगे
“बाळासाहेब ठाकरेंनी नेहमी मुस्लिमांना पाठिंबा दिला, मशिदीवरील भोंगे काढा अशी त्यांची भूमिका कधीच नव्हती”