मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये मंगळवारी जनसुनावणीदरम्यान एक अनोखे प्रकरण समोर आले, जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. घरमालक आपल्या घरातील पंतप्रधान मोदींचे चित्र काढून टाकण्यासाठी भाडेकरूवर दबाव आणत होता. तसे न केल्यास घर रिकामे करण्याची धमकी देत असल्याची तक्रार भाडेकरूने जनसुनावणीत केली आहे.(Homeowner gets angry over Modi’s photo posted in the house)
दर मंगळवारी रिगल तिराहे पोलिस आयुक्त कार्यालयात जनसुनावणी घेतली जाते. मंगळवारी हे प्रकरण त्यात पोहोचले होते. तक्रार ऐकून अधिकारीही काही काळ बुचकळ्यात पडले होते. पीर गली येथील रहिवासी युसूफ यांनी ही धक्कादायक तक्रार केली आहे.
पीएम मोदींच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या युसूफने सांगितले की, त्यांनी त्यांच्या भाड्याच्या घरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावले आहे. मात्र घरमालक याकूब मन्सूरी आणि सुलतान मन्सूरी यांनी या फोटोंवर आक्षेप घेतला आहे. युसूफने आरोप केला आहे की, त्यांचे घरमालक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो हटवण्यासाठी दबाव आणत आहेत. त्याने तसे करण्यास नकार दिल्याने घरमालकांनी त्याला घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यानंतर भाडेकरूने हे प्रकरण जनसुनावणीत मांडण्याचा निर्णय घेतला.
अतिरिक्त डीसीपी मनीषा पाठक सोनी यांनी मिडीयाला सांगितले की, युसूफच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सदर बाजार टीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “तक्रारदार जनसुनावणीला आले होते आणि त्यांनी तक्रार दाखल केली होती की, घरमालक त्यांच्यावर पंतप्रधान मोदींचे फोटो काढण्यासाठी दबाव आणत होता.
युसूफवर पीएम मोदींचा प्रभाव आहे आणि त्यांचे फोटो काढून टाकण्यास सांगणे हे एखाद्याच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या इंदूरमध्ये, देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पंतप्रधानांच्या फोटोवरून वाद चव्हाट्यावर आला आहे. तसेच पोलिसांच्या जनसुनावणीपर्यंत पोहोचलेले हे बहुधा पहिलेच प्रकरण असेल. याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राजकीय भूकंप होणार? भाजपा खासदार आणि संजय राऊतांमध्ये ३ तास खलबत; नेमकं काय घडतंय?
कौतुकास्पद! दीपिका पादुकोणने विदेशात वाढवला भारताचा मान; मिळवला हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार
या मुस्लिम व्यक्तीने लटकावला पशुपतिनाथ मंदिरात ३७०० किलोचा सर्वात मोठा घंटा, मोठे-मोठे इंजिनीअर झाले फेल
पुन्हा लग्नबंधनात अडकणार UPSC टॉपर टीना डाबी, जाणून घ्या कोण बनणार नवरदेव