Share

ड्रग्ज केसमध्ये आर्यन खानला क्लिनचीट मिळताच गृहमंत्रालयाने समीर वानखेडे भोवतीचा फास आवळला

क्रूझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केंद्र सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी योग्य तपास न केल्याने समीर वानखेडेवर कठोर कारवाईचे आदेश गृह मंत्रालयाने जारी केले आहेत. सरकारी सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, गृह मंत्रालयाने अर्थ मंत्रालयाला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी समीर वानखेडेची चौकशी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, NCB ने शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली. या प्रकरणी केवळ 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुराव्याअभावी आर्यनसह 6 जणांची सुटका करण्यात आली आहे.

एनसीबीचे डीजी एसएन प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, आर्यन खान ड्रग प्रकरणात समीर वानखेडेच्या टीमने चूक केली. अटकेवेळी समीर वानखेडे या प्रकरणाचा तपास करत होते. प्रधान यांच्या म्हणण्यानुसार, जर एनसीबीने चूक केली नसती तर एसआयटीने तपास स्वतःच्या हातात का घेतला असता.

याप्रकरणी एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवालही लवकरच येऊ शकतो, त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वानखेडे यांनी ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी दक्षता पथक लवकरच अहवाल देऊ शकते.

एनसीबीच्या तपास पथकाशी संबंधित सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले की, आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटशी संबंधित असल्याचे दाखवणारा कोणताही पुरावा NCB ला सापडला नाही. WhatsApp चॅट मधून देखील पुरावा नाही मिळाला की आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग आहे.

तसेच, या प्रकरणाचा तपास करणार्‍या SIT टीमला आढळले की आर्यन खानला क्रूझवर छापा टाकताना अटक करण्यात आली होती. त्या छाप्यात अनेक गैरप्रकारही घडले. आर्यन खानकडेही ड्रग्ज सापडले नाही. एसआयटीने असेही सूचित केले आहे की छापेमारीच्या वेळी अधिकाऱ्यांना आर्यन खानचा फोन घेण्याची गरज नव्हती.

इतर

Join WhatsApp

Join Now