हॉलिवूडची प्रसिद्ध गायिका रिहाना (Rihanna) लवकरच आई होणार आहे. ती सध्या तिच्या प्रेग्नेन्सीचा काळ एन्जॉय करत आहे. रिहानाने जेव्हा तिच्या प्रेग्नेन्सीची घोषणा केली होती तेव्हापासूनच ती तिचा बोल्ड आणि सिजलिंग लूक दाखवत आहे. आता तर रिहानाने कहरच केला आहे. तिने टॉपलेस होत बाथटबमध्ये मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
रिहानाने नुकतीच एका मॅगजीनसाठी फोटोशूट केलं आहे. यामध्ये रिहानाने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करत असे पोझ दिले आहेत जे पाहून चाहते थक्क झाले आहेत. रिहानाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर फोटो शेअर केले असून यामध्ये प्रेग्नेन्सीच्या काळातही तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.
रिहानाने शेअर केलेल्या पहिल्या फोटोत ती फक्त ओव्हर कोट घालून काऊचवर आरामात बसलेली दिसून येत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती ब्रालेस असून केवळ अंगावर एक जॅकेट घेतलेली दिसून येत आहे. तिसऱ्या फोटोत तर रिहाना चक्क टॉपलेस असून बाथटबमध्ये बसून बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे.
यासोबतच रिहानाने इतर अनेक फोटो शेअर केले असून यामध्ये ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसून येत आहे. सध्या रिहानाचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. याशिवाय रिहानाने या फोटोशूटदरम्यानचा एक व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे. यामध्ये ती वेगवेगळे पोझ देताना दिसून येत आहे.
रिहानाच्या प्रेग्नेन्सीच्या काळातील तिच्या कपड्यांवरून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण तिच्यावर टीकाही करत आहेत. तर नुकतीच एका मुलाखतीत बोलताना रिहानाने तिच्या कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
रिहानाने म्हटले की, ‘गर्भवती महिलांसाठी काय योग्य आणि काय नाही ही विचारसरणी आम्ही बदलू अशी मी आशा करते’. तिने पुढे म्हटले की, ‘सध्या माझ्या शरीरात होणाऱ्या अनेक आश्यर्यकारक बदलांचा मी अनुभव घेत आहे. आणि यासाठी मी अजिबात लाज बाळगणार नाही. हा काळ एखाद्या उत्सवासारखा असायला पाहिजे. आणि तसेही कोणी आपली प्रेग्नेन्सी का लपवून ठेवावी?’ असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात दुरावा? ‘त्या’ एका पोस्टमुळे चर्चांना उधाण
‘मन उडू उडू झालं’ फेम ह्रता दुर्गुळेच्या लग्नाची तारीख आली समोर; ‘या’ दिवशी दिग्दर्शकासोबत बांधणार लग्नगाठ