Share

Hollywood: ‘हॉलीवूड हे सर्वात मोठे वेश्यालय, पोर्नोग्राफीने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले’, बड्या पॉर्नस्टारच्या नवऱ्याची पोस्ट व्हायरल

kanye west

हॉलिवूड(Hollywood): हॉलिवूडमधील प्रसिद्ध पॉर्न स्टार किम कार्दशियनचा आधीचा पती रॅपर कान्ये वेस्ट त्यांच्या वादग्रस्त विधानांसाठी ओळखला जातो. सध्या कान्ये त्याच्या आणखी एका पोस्टमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. कान्येने किम कार्दशियनच्या कुटुंबाबाबत एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे.

कान्ये वेस्टने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. नंतर त्याने तो व्हिडीओ डिलीट केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने किम कार्दशियन आणि तिची धाकटी बहीण कायली जेनर यांच्याबद्दल सांगितले. त्याने लिहिले की पोर्नोग्राफीमुळे त्याचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यालाही पोर्नोग्राफीचे व्यसन आहे. किम कार्दशियनची आई क्रिस जेनरबद्दल कान्ये वेस्टने लिहिले की, ‘जर क्रिसने तुम्हाला प्लेबॉय फोटोशूट करायला लावले तर करायचे नाही.

ज्याप्रकारे त्याने किम आणि काइलीला ते करायला लावले होते. हॉलीवूड हे सर्वात मोठे वेश्यालय आहे. पोर्नोग्राफीने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले. मी त्याच्या व्यसनाशी झुंजत आहे. पण मी नॉर्थ आणि शिकागो या माझ्या मुलींच्या बाबतीत हे होऊ देणार नाही. किम कार्दशियनने २००७ साली प्लेबॉय मॅगझिनसोबत फोटोशूट केले होते.

त्याच वेळी, काइली जेनरने 2019 मध्ये मासिकासोबत तिचे फोटोशूट केले. किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट यांनी 2014 मध्ये विवाह केला होता. त्यांना चार मुलं आहेत. त्यांना नॉर्थ वेस्ट आणि शिकागो वेस्ट या दोन मुली आणि सालम वेस्ट आणि सेंट वेस्ट ही दोन मुले आहेत. मार्च 2022 मध्ये किमने कान्येपासून घटस्फोट घेण्याची घोषणा केली होती.

कान्ये आणि किमचे काही मेसेजही व्हायरल झाले आहेत. मात्र, त्याने आता मॅसेजची पोस्ट डिलीट केली आहे. तू थांबशील का प्लीज, असं समोरचा व्यक्ती बोलताना दिसत आहे. त्याला कान्येने उत्तर दिलं होतं. समोरासमोर बोलण्याची काहीच गरज नाही. तुला हे निवडण्याचा अधिकार नाही. मुलं शिकण्यासाठी कुठे जातील? तुला बोलण्याचा अधिकार का आहे? कारण तू अर्धी श्वेत वर्णीय आहेस, असं कान्ये या मेसेजमध्ये बोलताना दिसत आहे.

कान्ये वेस्ट हा युनायटेड स्टेट्समधील जगप्रसिद्ध हिप हॉप गायक आणि संगीतकार आहे. तो जगातील सर्वात प्रसिद्ध संगीतकारांपैकी एक आहे. लाखोहून अधिक अल्बम आणि डिजिटल डाउनलोड्सच्या विक्रीमुळे तो इतिहासातील सर्वात यशस्वी कलाकारांपैकी एक बनला आहे. एकूण 21 ग्रॅमी पुरस्कार, ज्यामुळे तो 21 व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित कलाकार बनला.

महत्वाच्या बातम्या
‘हॉलीवूड हे सर्वात मोठे वेश्यालय, पोर्नोग्राफीने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले’, बड्या पॉर्नस्टारच्या नवऱ्याची पोस्ट व्हायरल
पुणेकरांसाठी खुशखबर! पुण्यात उडत्या बसेसची योजना! वाहतुकीच्या समस्येवर गडकरींचा रामबाण उपाय! 
Bill Gates : कोरोना लशीमुळे तरूणाचा मृत्यू; बिल गेट्स आणि आदर पुनावालांवर कोर्टाची मोठी कारवाई
Manipur: नितीशकुमारांचे सगळे आमदार भाजपने फोडले; फक्त एकच आमदार पक्षात राहीला शिल्लक

इतर ताज्या बातम्या तुमची गोष्ट मनोरंजन

Join WhatsApp

Join Now