गेल्या दोन महिन्यांपासून राज्यातील राजकारण चांगलेच तापलेलं पहायला मिळत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अनेक जवळच्या व्यक्तींनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरेंना जबर धक्का बसला. सत्तेत असून देखील शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे अख्ख ठाकरे सरकार कोसळलं.
नंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. या नाट्यमय घडामोडींमधील महत्त्वाची बाब म्हणजे, याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेले हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी नंतर शिंदे गटाला समर्थन दिले.
त्यानंतर बांगर यांच्यावर जहरी टीका झाली. शिवसेनेचा मराठवाड्यातला आक्रमक चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार संतोष बांगर यांनी गद्दार, बंडखोर म्हणून हिणवणाऱ्यांचं कानशील लाल करा, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी देखील शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला.
आता या दोघांवर देखील हिंगोलीच्या युवासेना राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी सडकून टीका केली आहे. ‘हेमंत पाटील पुन्हा निवडून आले तर 1-1 रुपया जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख लिटर दुधाने अभिषेक घालीन असं जाहीर आवाहन घुगे यांनी केले आहे.
याबाबत पत्रकारांशी बोलताना घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांचे देखील चॅलेंज स्वीकारले आहे. बांगर यांनीही पुन्हा निवडून येऊन दाखवावं. ते पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन असंही खुलं आव्हान दिलीप घुगे यांनी केले आहे. यामुळे आता राजकीय वातावरण असल्याच बोललं जातं आहे.
दरम्यान, बांगर (MLA Santosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. पक्षाशी बंडखोरी केल्याची शिक्षा पक्षाने बांगर यांना दिली.
महत्त्वाच्या बातम्या
गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाला श्रीकांत शिंदेंचा विरोध; मुख्यमंत्र्यांना जाहीर इशारा देत म्हणाले…
इंदूरीकर महाराज पुन्हा अडचणीत; भडकलेल्या गावकऱ्यांचा थेट पोलिस ठाण्यात ठिय्या
‘वर्षातून एकदा दहीहंडी फोडण्याऱ्या गोविंदांना आरक्षण देण्यापेक्षा रोज साहसी खेळ करणाऱ्या डोंबाऱ्यांना आरक्षण द्या’
Mumbai : दहीहंडी उत्सवादरम्यान मुंबईत मोठी दुर्घटना; चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; पहा व्हिडीओ