Share

माझ्या मृत्यूस ‘ते’ चौघे जण जबाबदार, मृतदेहाच्या अंतर्वस्त्रात चिठ्ठी आढळल्याने हिंगोली हादरलं

hingoli

hingoli apparam rathod death | हिंगोली जिल्ह्यातील कमळनुरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. २८ डिसेंबरला रामेश्वरतांडा शिवारात हा मृतदेह आढळून आला असून त्याच्या अंतर्वस्त्रामध्ये एक चिठ्ठीही आढळून आली आहे.

आपला मृत्यूला चौघेजण कारणीभूत असल्याचे त्या चिठ्ठीत म्हटले आहे. तसेच बनियनवरही तेच लिहीण्यात आले आहे. हे पाहून पोलिसही चक्रावले आहे. त्यामुळे नक्की काय झालं आहे हेही पोलिसांना समजत नसून पोलिस त्याचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तो मृतदेह ५३ वर्षीय वृद्धाचा आहे. अप्पाराम रामा राठोड असे त्या व्यक्तीचे नाव होते. ते नांदेडचे रहिवासी होते. पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले, जमादार शेख बाबर, जमादार शेख जावेद हे याप्रकरणी तपास करत आहे.

पोलिस घटनास्थळी पोहचले तेव्हा एका वृद्धाचा मृतदेह त्यांना आढळून आला. त्याच्या बाजूला विषारी औषधाची बाटलीही होती. पंचनामा करुन त्या मृतदेहाला बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या अंतर्वस्त्रात एक चिठ्ठी आढळल्याचे समोर आले.

त्या चिठ्ठीमध्ये सुनेसह चारजणांची नावे लिहीण्यात आलेली आहे. आपण चौघांच्या त्रासाला कंटाळून स्वत:चा जीव घेत आहोत, असे त्या चिठ्ठीत म्हटले आहे. विशेष म्हणजे बनियनच्या दोन्ही बाजूंना एकाच हाताने लिहिलेले आहे. त्यामुळे पोलिसही हे पाहून चक्रावले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अप्पाराम यांना दोन मुले आणि तीन मुली आहे. मोठा मुलगा हा अभियंता असून त्याचे लग्न झाले आहे. त्या चिठ्ठीमध्ये सुनेसह तिच्या आईवडिलांचे आणि तिच्या भावाचे नाव लिहिले आहे.

शवविच्छेदनानंतर मृतदेह बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. त्यावेळी मृतदेहाच्या अंतर्वस्त्रात एक चिठ्ठी आढळून आली. यामध्ये सुनेसह चौघांची नावे लिहिली असून त्यांनी आपल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

तेथे बनियनवर हाताने लिहिले असून चौघांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहीले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते बनीयनच्या दोन्ही बाजूला हाताने लिहिलेला असल्याने ते दोन्ही बाजूंनी कसे लिहिता येईल..? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मृतकाच्या पश्चात दोन मुले व तीन मुली असा परिवार असून सर्व विवाहित आहेत. त्यांचा मोठा मुलगा उदगीर येथे अभियंता असून त्याचे लग्न रामेश्वरतांडा येथील मुलीशी झाले आहे. या चिठ्ठीत सुनेचे आई-वडील आणि भाऊ यांचीही नावे असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

तसेच मृताच्या हातावर व पायावर जखमेच्या खुणा असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. रात्री आठ वाजेपर्यंत उत्तरायण तपासणीही सुरू झाली नव्हती. ही आत्महत्या की खून असा सवाल उपस्थीत होत आहे.

महत्वाच्या बातम्या-
डुलकी लागली अन् दुभाजकाला धडकली कार; गंभीर जखमी पंतने स्वत: सांगीतले कसा झाला अपघात, म्हणाला…
uddhav thackeray : बंडखोरीनंतर दीपक केसरकर पहिल्यांदाच आले ठाकरेंच्या समोर, संतापलेले ठाकरे जाब विचारत म्हणाले…
nilesh rane : राणेंना नियम कायदे कळत नाहीत; स्वतः निलेश राणेच असं का म्हणाले? वाचा…

ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now