शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या जवळपास ४० आमदारांना सोबत घेऊन बंडखोरी केल्याने राज्यात राजकीय भूकंप निर्माण झाला आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. राज्य सरकारला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे.
यावर एकनाथ शिंदे म्हणाले, आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं हिंदुत्व सोडलं नाही. हेच हिंदुत्व घेऊन राजकारण करणार, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी नवीन इनिंग सुरू करण्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पडद्याआड असलेला भाजप आता समोर आला आहे.
२०१४ आणि २०१९ साली भाजप आणि शिवसेनेत युती होती, तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात समृद्धी महामार्ग ड्रीम प्रोजेक्ट होता. याच समृद्धीच्या माध्यमातून एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील जवळीक वाढली होती.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिंदेंनी किमान १ हजार कोटींचा निधी औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना दिली. त्यामुळे बंडात ते त्यांच्या गळाला लागले, असे स्पष्ट दिसत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान एकनाथ शिंदे समृद्धी महामार्गाच्या निमीत्ताने औरंगाबाद जिल्ह्यात शिवसेनेच्या सर्व आमदारांशी जवळ आले होते. शिंदेंशी सर्वाधिक जवळीक असलेले आमदार म्हणून आमदार संजय शिरसाट यांची ओळख आहे. २०१९ मध्ये त्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेवरून लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
निवडून आल्यावर त्यांना शिंदे यांनी बीड बायपाससाठी ३७१, सातारा देवळाई ड्रेनेज २००, रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान दिले. आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात रस्त्यांसाठी निधी हवा आहे, असे कळल्यावर शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत त्यांना तो मिळवून दिल्याची माहिती आज काही वृत्तपत्रांनी दिली आहे.
तसेच, एकनाथ शिंदे हे औरंगाबादचे पालकमंत्री होते त्यावेळी त्यांनी रमेश बोरनारे यांना जवळ केले होते. वैजापूर नगरपालिकेला ३० कोटी २०१९ मध्ये शिंदे औरंगाबादचे पालकमंत्री असताना रमेश बोरनारे तालुकाप्रमुख होते. तेव्हापासून त्यांच्यात चांगले संबंध तयार झाले.
बोरनारेंना उमेदवारी देण्यात शिंदेंनी महत्त्वाची भूमिका असल्याचेही बोलले जात आहे. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी वैजापूर नगरपालिकेला ३० कोटींचा निधी मिळवून दिला. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा निधी देण्यात आला.