Share

“हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली आणि राज ठाकरे पुन्हा बदलले”

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे नेते राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा लाऊडस्पीकर लावून हनूमान चालिसा वाजवू अशी भूमिका जाहिर केली होती. त्यानंतर या भूमिकेला विरोध दर्शवल्यामुळे मनसेने पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे यांना पदावरुन हटवून टाकले होते. या घडामोडी सुरु असतानाच वसंत मोरेंनी राज ठाकरेंची भेट घेतली.

या भेटीनंतर वसंत मोरे पक्षातच राहणार असल्याचे मनसेकडून स्पष्ट झाल्याचे दिसत आहे. परंतु मनसेच्या या भूमिकेवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीका केली आहे. त्यांनी थेट मनसे नेते राज ठाकरेंवर निशाणा साधत राज ठाकरे आता आपली भूमिका बदलत असल्याचे म्हटले आहे.

हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली आणि राज ठाकरे पुन्हा बदलले अशी टीका दवे यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझे मतदार काम नाही धर्म पाहून मतदान करतात. त्या मतांची काळजी असल्याने भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावणार नाही, असे स्पष्ट सांगून आदेश धुडकवणाऱ्या मोरेंना पक्षातच ठेवण्याचे राज साहेबांनी स्पष्ट केले आहे.

तसेच, राज ठाकरेंनी पुन्हा भूमिका बदलली आहे. हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन राज ठाकरेंनी भूमिका बदलू नये, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. यापूर्वीही राज ठाकरेंच्या भोंग्याच्या वक्तव्याला आनंद दवेंनी पाठिंबा दाखविला होता. त्यांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे. आता या भूमिकेवरुन त्यांनी हटू नये, असे त्यांनी म्हटले होते.

इतकेच नव्हे तर, मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्वाचे आहे. हिंदुत्ववादी तुमच्याकडे आशेने पाहत आहेत असे राज ठाकरेंना आनंद दवेंनी सांगितले होते. दरम्यान राज ठाकरेंच्या आदेशाला विरोध केल्यानंतर वसंत मोरेंची उचलबांगडी करण्यात आली. यानंतर अखेर 10 एप्रिल रोजी राज ठाकरे आणि वसंत मोरेंची भेट झाली.

महत्वाचे म्हणजे या भेटीनंतर वसंत मोरेंनी आपण 100 टक्के समाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच, आपण पक्षातच राहणार आहोत. आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. असे मोरेंनी सांगितले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतरच आनंद दवे यांनी ठाकरेंनी शब्द पाळला नसल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या
ऑनलाईन परीक्षा देऊन पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन, पुन्हा परीक्षा द्याव्या लागणार?
आलियाचे लग्न होणार समजतात रोमीओ झाला वेडा; रागाच्या भरात करतोय असे काही की…
अनुराग कश्यपने लग्न न करताच मंदाना करिमीला केलं प्रेग्नेंट? लॉकअपमध्ये झाला खुलासा
महागाईविरोधात रान पेटवणाऱ्या स्मृती इराणींनी मारला यू-टर्न, या गोष्टींवर फोडलं इंधन दरवाढीचं खापर, पाहा VIDEO

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now