हिंदुस्तानी भाऊ उर्फ विकास पाठक याला शनिवारी (काल) वाद्रे न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हिंदुस्थानी भाऊला 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी एक दिवसांची वाढ करण्यात आली होती.
काल त्याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी अधिक चौकशीसाठी हिंदुस्तानी भाऊच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर हिंदुस्तानी भाऊला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
याबाबत बोलताना हिंदुस्तानी भाऊचे वकील अंकित टकले म्हणाले, जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे, त्यावर सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच काल झालेल्या सुनावणी दरम्यान ७०० डॉलर कुठून आले, असा सवाल पोलिसांनी केला. त्याबाबत बोलताना वकील अंकित टकले म्हणाले, ७०० डॉलर ज्या बँक खात्यात आले आहे ते खात कोणीतरी हॅक केले आहे.
तसेच त्या खात्याची माहिती आमच्याकडे नाहीये, खात्याची अधिक माहिती नसल्यामुळे ७०० डॉलर कुठे गेले याबाबची आम्हाला कल्पना नसल्याचे हिंदुस्तानी भाऊचे वकील अंकित टकले यांनी सांगितले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यभरात दहावी-बारावीच्या परिक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या, या मागणीसाठी लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तसेच शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरा बाहेर एकत्र येत जोरदार घोषणाबाजी केली होती.
या प्रकरणी विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास फाटक याने भडकवल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थांची जबाबदारी मी का घेऊ असा सवाल हिंदुस्थानी भाऊने केला होता. विद्यार्थी आंदोलन करतायत ही जबाबदारी राज्य सरकारची आहे असंही हिंदुस्थानी भाऊने सांगितलं होतं.
गेल्या तीन महिन्यांपासून दहावी-बारावीचे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये होते, अनेकांनी जीव देण्याची इच्छा व्यक्त केली, त्यामुळेच रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं आपण आवाहन केल्याचं त्याने म्हटलं होतं. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामागे सोशल मीडिया सेलिब्रिटी हिंदुस्थानी भाऊचा व्हिडीओ असल्याचे बोललं जात आहे.
चार दिवसांपूर्वी हिंदुस्थानी भाऊचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. परीक्षा ऑफलाईन न घेता ऑनलाईन घ्याव्यात. शक्य झाले तर रद्द करा पण विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळू नका. जर निर्णय बदलला नाही तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असे व्हिडीओत हिंदुस्थान भाऊने म्हटले होतं.
महत्त्वाच्या बातम्या
भन्नाट ऑफर! 1,150 रुपयांचे किंमतीचे हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन मिळणार मोफत
Tata Play देणार Jio ला टक्कर, ग्राहकांना मोफत दिले 1,150 रुपयांचे इंटरनेट कनेक्शन
लतादीदींच्या जाण्याने मोदींवर कोसळला दुःखाचा डोंगर; म्हणाले, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत..
ओवेसींच्या विधानावरुन नवा वाद ! ‘मृत्यूनंतर मला औरंगाबादमध्ये दफन केलं जावं’; शिवसेना भडकली…