बॉलीवूड अभिनेता आमिर खानचा(Aamir Khan) ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये त्याच्या विरुद्ध करीना कपूर खान दिसणार आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. जिथे हा चित्रपट 2021 च्या ख्रिसमसला आणि नंतर 2022 च्या बैसाखीला येणार होता.(hindu-organization-burns-aamir-khans-poster-before-release-of-lal-singh-chadha-trailer)
पण आता हा चित्रपट ऑगस्ट 2022 मध्ये पडद्यावर येणार आहे. त्याचा ट्रेलर अद्याप आलेला नाही. मात्र या चित्रपटाला विरोध सुरू झाला आहे. यूपीच्या सुलतानपूरमध्ये काही लोकांनी आमिर आणि त्याच्या चित्रपटाविरोधात जोरदार आंदोलने केली जात आहेत. अभिनेत्याचे पोस्टर्सही फाडले जात आहेत आणि जाळलेही जात आहेत.
वृत्तानुसार, सुलतानपूरच्या विजेथुआ खाममध्ये हिंदूत्ववादी संघटनेने(Pro-Hindu organization) निषेध नोंदवला आहे. आता 29 मे रोजी आयपीएलची फायनल होणार आहे, ज्या दिवशी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईल आणि त्या दिवशी ते आंदोलनही करतील. सनातन रक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल सिंह म्हणतात, आमिर खानला आयपीएलमध्ये बोलावण्यात आले आहे. आमिर अनेकदा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेच्या विरोधात बोलतो. हा तोच आमिर खान आहे जो हिजाबचा सर्वात मोठा समर्थक आहे. स्वतःची मुलगी फेसबुक आणि गुगलवर कसे फोटो पोस्ट करते हे सर्वांनाच माहीत आहे.
राहुल सिंह(Rahul Singh) पुढे म्हणाले, ‘इतकेच नाही तर त्याची पत्नीही भारतात राहण्यास घाबरते. आमचे आयपीएल व्यवस्थापन अशा लोकांना कसे आमंत्रित करू शकते. याचा सर्व सनातनींना त्रास होत आहे. आमिरला काढून टाकावे आणि तसे झाले नाही तर आम्ही दिल्लीपर्यंत जाऊ. आंदोलन करू. तसेही, सनातन रक्षक सेनेच्या वतीने अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
आमिर खानचे चाहते त्याच्या ‘लाल सिंह चड्ढा'(Lal Singh Chadha) या चित्रपटाची वाट पाहत आहेत. त्याचा वर्षभरात एकचं चित्रपट प्रदर्शित होतो आणि तो सुपरहिट ठरतो. गेल्या काही वर्षांपासून अभिनेता मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपट ठरेल, अशी अपेक्षा आहे. त्याचे ‘कहानी’ हे गाणे रिलीज झाले असले, तरी त्याला चांगलीच पसंती मिळाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले असून त्यांनी ‘सिक्रेट सुपरस्टार’ची निर्मितीही केली आहे.