Share

पाकिस्तानात १८ वर्षीय हिंदु मुलीची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, कारण वाचून तुम्हालाही येईल चीड

crime

पाकिस्तानमधून आलेल्या धक्कादायक घटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये हिंदू असुरक्षित असल्याचा मुद्दा समोर आला आहे. पाकिस्तानमध्ये एका हिंदू मुलीचं अपहरण करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर हल्लेखोरांनी रस्त्याच्या मधोमध गोळ्या झाडून तिची हत्या केली आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. सुक्कुर शहरामधील रोही परिसरात हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील सिंध प्रांतांमध्ये एका १८ वर्षीय मुलीवर गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आली आहे. अपहरणकर्त्यांना विरोध केल्याने ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.

माध्यमांमध्ये आलेल्या माहितीनुसार, पूजाचं आधी रस्त्यावर अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तिने यासाठी विरोध केल्यावर हल्लेखोरांनी तिला रस्त्याच्या मध्यभागी गोळ्या घातल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या मुलीच नावं पुजा ओड असं आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा पंचानामा सुरु केला असून हल्लेखोरांचा शोध ते घेत आहेत. याबाबत द फ्रायडे टाइम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे दरवर्षी अल्पसंख्याक समुदायातील, विशेषतः सिंधमधील महिलांचं अपहरण केलं जातं आणि धार्मिक अतिरेकी जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण करतात, अशी माहिती हाती आली आहे.

दरम्यान, चिंतेची बाब म्हणजे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक समुदायामधील महिलांवर हल्ला होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. विशेषता सिंध प्रांतामध्ये अनेकदा हिंदू माहिलांचं अपहरण करण्याच्या घटना घडतात. या महिलांचं अपहरण करुन अनेकदा त्यांना धर्मांतर करण्यास भाग पाडलं जातं असल्याची माहिती समोर आली आहे.

तसेच पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, पाकिस्तानमधील एकूण लोकसंख्येच्या 1.60 टक्के आणि सिंधमध्ये 6.51 टक्के हिंदू समुदाय आहे. पाकिस्तानमधील सराकरी आकडेवारीनुसार, २०१३ ते २०१९ दरम्यान बळजबरीने धर्मपरिवर्तन घडवून आणल्याचे १५६ प्रकार सिंध प्रांतामध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या
पाकीस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही केला भारतीय लष्कराला सॅल्यूट; तोंडभरून कौतूक करत म्हणाले..
पद्म पुरस्कार घेण्यासाठी आलेले 126 वर्षीय स्वामी शिवानंद PM मोदीसमोर नतमस्तक; व्हिडिओ तुफान व्हायरल
बांगलादेशला धूळ चारत भारताचा मोठा विजय; वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये जाण्याचा रस्ता सुकर
‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता

 

इतर क्राईम ताज्या बातम्या राज्य

Join WhatsApp

Join Now