Share

पती रूममध्ये आला आणि.., लग्नाच्या पहिल्याच रात्री प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडला भन्नाट किस्सा

नुकताच स्टार प्लसवर स्मार्ट जोडी हा रिअँलिटी शो सुरु झाला आहे. या शोमध्ये अनेक कलाकारांनी आपला सहभाग नोंदविला आहे. जे कलाकार रिअर आयुष्यात विवाह बंधनात आहेत त्यांना या कार्यक्रमात बोलविण्यात आले आहे. त्यानुसार ‘मैने प्यार किया’ मधील अभिनेत्री भाग्यश्री आणि तिचा पती हिमालय दासानी यांनी सुध्दा आपली उपस्थिती दर्शविली आहे.

नुकताच हिमालय दासाने आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीचा किस्सा कार्यक्रमात सर्वांना सांगितला आहे. हा किस्सा सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला आहे. हिमालयाने सांगितले की, लग्नाच्या पहिल्या रात्री मी खुप अपेक्षेने खोलीत गेलो. मला वाटले भाग्यश्री तोंडावर पदर घेऊन माझी वाट बघत बसली आहे.

परंतु सगळे काही उलटे झाले. मी खोलीत गेलो परंतु यावेळी भाग्यश्री नाईट ड्रेस घालून उभी होती. ती मला म्हणली, मला खूप झोप लागली आहे. यानंतर ती खरच झोपून गेली. हा प्रसंग आठवून दुसऱ्या दिवशी दोघे ही खूप हसली. या प्रसंगाला आठवणीत ठेवून दोघांनी नविन आयुष्याला सुरवात केली.

ज्यावेळी हिमालयने हा किस्सा कार्यक्रमात सांगितला तेव्हा कोणालाच हसू आवरले नाही. अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. त्यामुळेच हिमालय आणि भाग्यश्रीचा हा किस्सा चर्चेत आला आहे. असे अनेक किस्से या कार्यक्रमात ऐकायला भेटतात. हा कार्यक्रम एका तेलगू सिरीयलचा रिमेक आहे. परंतु तरी देखील या कार्यक्रमाला चांगली पसंती मिळत आहे.

मुख्य म्हणजे अभिनेत्री अंकिता लोंढे आणि विकी जैन, नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा, अर्जुन बिजवाली आणि नेहा बिजवाली, मोनालिसा आणि विक्रांत असे सुपरहिट कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. यासाठी त्यांच्यावर बक्कळ असा पैसा सुध्दा खर्च करण्यात आला आहे.

हिमालय आणि भाग्यश्रीला एका एपिसोडसाठी 10 लाख रुपये देण्यात आले आहेत. तर अंकिता आणि विकीने 6 लाख घेतले आहे. अर्जुन आणि नेहाने सुध्दा 7 लाख रुपये एका एपिसोडसाठी घेतले आहेत. अशा अनेक कलाकारांनी बक्कळ रक्कम एका एपिसोडसाठी घेतली आहे.

महत्वाच्या बातम्या
आयडियाची कल्पना! नवरा बायकोने सुरू केला सुपारीच्या पानांचा व्यवसाय, आता कमावले करोडो
राज्यपालांना हटवण्यासाठी एक फोनच बस्स झाला; महाविकास आघाडीतील बड्या मंत्र्याची थेट धमकी
…तर मी विधानसभेत फाशी घेईन; सभागृहात आमदार रवी राणा भडकले, सभागृह स्तब्ध
शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर, खोलीत आढळले रक्ताचे डाग

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now