highcourt on rutuja lateke resign letter | सध्या सर्वांचे लक्ष्य हे अंधेरी पुर्वच्या पोटनिवडणूकीकडे लागलेले आहे. या निवडणूकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या उमेदवारी अर्ज भरणार आहे. पण अद्याप त्यांना अर्ज भरता आलेला नाही. त्या महापालिकेत कार्यरत होत्या. पण त्यांचा राजीनामा स्वीकारल्या न गेल्यामुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही.
अर्ज भरण्यासाठी अडचण येत असल्यामुळे ऋतुजा लटके या मुंबई उच्च न्यायालयात गेल्या होत्या. याबाबची सुनावणी सुद्धा आज पार पडली आहे. या सुनावणीत ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.
ऋतुजा लटके यांनी एक महिन्याआधीच राजीनामा दिला होता. पण महापालिका त्यांचा राजीनामा स्वीकाण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण आता न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाकरे गटाने याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयात तातडीने सुनावणी करण्यात आली होती. यावेळी ऋतुजा लटके यांच्या वकीलांनी सांगितले की, लटके यांनी राजीनामा २ सप्टेंबर रोजी दिला. त्यानंतर २९ सप्टेंबरला हा राजीनामा फेटाळण्यात आला. त्यानंतर ३ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही नियमांनुसार मुंबई महापालिकेकडे राजीनामा दिला होता. तसेच एक महिन्याचा नोटीस पिरियड सुद्धा दिला होता. त्यानंतर एक महिन्याचा पगार जमा करावा लागेल, असे आम्हाला सांगण्यात आले. तेव्हा पगारही जमा केला होता.
या प्रकरणावर बोलताना न्यायालयाने पालिकेला झापले आहे. ऋतुजा लटके या महापालिकेच्या सेवेत आहे. पण त्या जर निवडणूक लढवत असेल, तर काय अडचण आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ऋतुजा लटके यांचा राजीनामा शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत स्वीकारा, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या-
Ekanth Shinde : शिंदे मर्द आहेत, तसले बायकी धंदे उद्धव ठाकरेच…; शिंदेगटाचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
wedding ceremony : नवरीच्या मागून आला प्रियकर, तिच्या भांगेत ५ वेळा सिंदूर भरून केलं असं काही की वाचून धक्का बसेल
Sonia Gandhi: ‘हा’ नेता आहे सोनिया गांधींचे ATM; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या गंभीर आरोपांनी खळबळ