Share

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा दिलासा, न्यायालयाने चिन्हाबाबत दिला ‘हा’ निर्णय

shivsena uddhav thackeray

highcourt new decision about uddhav thackeray shivsena  | शिवसेनेचे चिन्ह सध्या गोठवण्यात आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेले हे चिन्हामुळे खुप गोंधळ उडाला होता.

तसेच मशाल या चिन्हाविरोधात समता पार्टीने दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली होती. आता ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. समता पार्टीने दाखल केलेली याचिका आता उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडलेले आहे. तसेच शिवसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. तसेच १२ खासदारही शिंदे गटात गेले आहे. त्यामुळे आपली खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे करताना दिसून येत आहे.

खरी शिवसेना कोणाची यावरुन सध्या सर्वोच्च न्यायालयात दोन्ही गटांमध्ये लढाई सुरु आहे. त्यामुळे अंधेरी निवडणूकीच्या आधी ठाकरे मशाल हे चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव देण्यात आले आहे. पण मशाल चिन्ह दिल्यामुळे स

मता पक्षाने दिल्लीच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता समता पार्टीच्या याचिकेवर आता सुनावणी झाली होती. पण न्यायालायने ही याचिका फेटाळली आहे. मशाल चिन्हावरील समता पार्टीचा दावा अयोग्य असल्याचे म्हणत न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.

ही याचिका फेटाळल्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मशाल हे चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार आहे.काही वर्षांपूर्वी समता पार्टीचे विलीनीकरण झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने मशाल हे चिन्ह गोठवले होते. पण आता निवडणूक आयोगाने हे चिन्ह ठाकरे गटाला दिल्यामुळे नवा वाद सुरु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-
world cup: जय शाह यांच्या ‘या’ वक्तव्यानंतर पाकिस्तान संतापला, वर्ल्ड कप खेळण्यास दिला नकार
वर्ल्ड कप विनर, डॉग लवर, मुलाच्या सिलेक्शनवरून वाद; वाचा BCCI चे नवे अध्यक्ष रॉजर बिन्नी यांच्याबद्दल..
bacchu kadu : बच्चू कडू सोंगाड्या असून ते तोडपाणी करतात; फडणवीसांच्या जवळच्या मित्राचे गंभीर आरोप

ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now