नागिन मालिकेतून घराघरात पोहोचलेली मौनी तिच्या फोटोंमुळे सतत चर्चेत असते. तिचे स्टाइलिश फोटो ती नेहमी इन्स्टग्रामवर टाकत असते. तिच्या अदांवर चाहते घायाळ असतात. आता पुन्हा एकदा ती तिच्या हॉट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. हे फोटो पाहून तुमच्या देखील हृदयाची धडधड वाढल्याशिवाय राहणार नाही.
यावेळी मौनी रॉयने आपल्या पिकनिकचे फोटो इन्स्टग्रामवर शेअर केले आहेत. इन्स्टग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मौनी रॉयचा हॉट स्टाइल लूक पाहायला मिळाला आहे. कॅमेरासमोर एकापेक्षा एक पोझ देत काढलेल फोटो तिने शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या डोळ्यांची पापणी देखील खाली पडताना दिसत नाही.
तिनं फोटो इन्स्टग्रामवर शेअर करत कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, ‘टेक मी बॅक’ या फोटोत ती स्विमिंग पूलमध्ये निवांत पोझ देत उभी असलेली दिसत आहे. डोक्यावर हात ठेवलेली तिची अदा खरोखरच घायाळ करणारी आहे. तिने स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग सूट घातलेला दिसत आहे.
मध्यंतरी तिचे बिकिनी परिधान केलेले फोटो देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला होता. या फोटोंमधील तिची स्टाईल पाहून चाहते वेडे झाले होते. तिने इंस्टाग्रामवर काळ्या रंगाच्या बिकिनीतील काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये तिचा हॉट अवतार दिसत होता.
27 जानेवरील रोजी मौनी रॉयने दुबई मधील तिचा प्रियकर सुरज नांबियारशी गोव्यात लग्न केलं. मल्याळी आणि बंगाली या दोन्ही पद्धतीत हा लग्न सोहळा पार पडला. तिने तिच्या करिअरची सुरुवात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेमधून केली.
यानंतर तिने कस्तुरी, दो सहेलिया, देवों के देव महादेव, नागिन, नागिन 2 मध्ये काम केले. यानंतर मौनी चित्रपटांकडे वळली आणि 2004 मध्ये रन चित्रपटात एक खास गाणे दिले. त्यानंतर मौनीने एका पंजाबी चित्रपटात काम केले. यानंतर मौनीने अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.