फॅशनच्या नावाखाली आजकाल काही मंडळी कधी काय करतील याचा नेम नाही. अशाच मंडळींपैकी एक अभिनेत्री सध्या चर्चेत आली आहे. तिने केलेल्या फॅशनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. तिला पाहून नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तुम्ही देखील तिने परिधान केलेले कपडे पाहिलेत तर नक्की अवाक व्हाल.
अनेकवेळा खरेदीला जायचे असेल तर आपण साधे कपडे घालून खरेदी करायला जात असतो. साधे कपडे घातल्यामुळे आपण कम्फर्टेबल होतो, मग व्यवस्थित शॉपिंग करता येते, आणि सामान देखील व्यवस्थित आणता येते. मात्र, आता या अभिनेत्रीने शॉपिंगसाठी जाताना जे कपडे परिधान केले आहेत, ते विचित्र आहेत.
तिला पाहून नेटकरी म्हणत आहेत, जिन्स हातात घेतली त्यापेक्षा पायात घाल. आता ही विचित्र कपडे परिधान केलेली अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, कान्ये वेस्टची प्रेयसी म्हणूनही कधीकाळी गाजलेली ज्युलिया फॉक्स आहे. ब्रेकअपनंतर ज्युलिया जेव्हा जेव्हा माध्यमांसमोर आली तेव्हा तेव्हा तिच्या चित्रविचित्र फॅशननं सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
अशा फॅशनसाठी चर्चेत येण्याची ज्युलियाची ही काही पहिलीच वेळ नाही. पण, किराणा खरेदीसाठी निघताना तरी किमान फॅशन सेन्स बाजूला ठेवायला हवा होता, हीच अपेक्षा तिचे नवे फोटो पाहणारे लोक व्यक्त करत आहेत. तिला तशा पद्धतीने प्रतिक्रिया देखील देत आहेत.
ज्युलियाच्या या लुकबद्दल बोलायचे झाल्यास, काळ्या रंगाच्या इनरवेअरवर तिनं डेनिम जॅकेट घातलं आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं डेनिमचे बूटही घातले आहेत. हे आपले सर्वात आवडीचे बूट असल्याचा खुलासा ज्युलियानं फार आधीच केला होता. मात्र, तिचा हा लूक सर्वांनाच भावला असं नाही.
बऱ्याचजणांनी या लूकमुळं ज्युलियाची खिल्लीही उडवली. फॅशनेबल होण्यात गैर काहीच नाही, पण तिथंही काही मर्यादांचं पालन होणं गरजेचं अशाच प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. दुसरीकडे उर्फी जावेदला ‘विचित्र पोशाखांची राणी’ म्हणून संबोधले जाते.