प्रेम हे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं… माणूस हा कितीही वेळा प्रेमात पडू शकतो. प्रेमाला वयाची अट नसते. कधी कोणावर कसे प्रेम होईल याबद्दल कोणालाच सांगता येणार नाही. मात्र आपलं पहिल प्रेम कोणच विसरू शकतं नाही. प्रेमाची सुरुवात ही शाळेपासूनच होतं असते.
अनेकदा कित्येक जण हे आपल्या शिक्षकांच्याच प्रेमात बुडालेले असतात. खरं तर शिक्षक हे आपले आई – वडिलांनंतरचे दुसरे गुरु असतात. परंतु, अनेकांच्या आयुष्यातलं पहिलं क्रश हे बहुतेकवेळा शाळेतले शिक्षकच असतात. ण कळत शिक्षक आवडू लागले की तो विषय देखील आवडू लागतो.
अगदी असंच काहीस तुमचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे सोबत घडलं होतं. एका मुलाखतीदरम्यान बोलताना स्व:त हेमंतने याबाबत कबुली दिली आहे. हेमंतच्या आयुष्यातलं पहिलं क्रश त्याच्या शाळेतल्या गणिताच्या बाई होत्या. हेमंतला या बाई इतक्या आवडायच्या की तो त्यांच्याकडे एकटक पहात बसायचा.
चला तर जाणून घेऊ या.. हेमंतने याबाबत काय सांगितले आहे? नेमका तो किस्सा काय? याबाबत हेमंत एका मुलाखतीत बोलत होता. त्याने सांगितलं की, मी आठवीत होतो आणि मला आमच्या गणिताच्या बाई खूपच आवडायच्या. मला असं वाटायचं की मला या बाईंमुळेच गणित आवडू लागेल की काय ! पण बाईंनी ती संधीच दिली नाही.
त्याचं झालं असं की, त्या वर्गात आल्या की मी त्यांच्याकडे एक टक लावून पाहत असतो. त्यांनी ते ओळखलं आणि त्या वर्गात आल्या की पहिल्यांदा मला बाहेर काढायच्या आणि मग त्या गणिताचा तास घ्यायच्या. त्यामुळे आठवीचं अख्खं वर्ष मी गणिताच्या तासाला वर्गाबाहेर जाऊनच काढलं, असे हेमंतने सांगितले.
दरम्यान, पुढे बोलताना हेमंतने शाळेच्या आठवणींबाबत किस्सा सांगताना सांगितले की, ‘शाळेची आठवण निघाली की मला शाळेतल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझा आठवीतला गणिताचा तास आणि त्या गणिताच्या बाई या दोनच गोष्टी सगळ्यात आधी आठवतात. पण त्यांचा आदर आपण नेहमीच करतो.’
महत्त्वाच्या बातम्या
अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘शिव तांडव स्रोत’चा पहिला पोस्टर, ‘या’ तारखेला गाणं येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मोठी बातमी! ईडीने नवाब मालिकांना घेतलं ताब्यात, पहाटे पहाटे केली धडक कारवाई
पुण्यातील मटका किंगची हत्या, अवघ्या १२ तासात आरोपींना ठोकल्या बेड्या, तपासात धक्कादायक माहिती उघड
तुमच्या हक्काचे मुंबईतील घर सोडून जाऊ नका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती