hemangi kavi share yatra photo | सेलिब्रिटी म्हटलं की त्यांची अलिशान लाईफस्टाईल आलीच. महागड्या गोष्टी, परदेशात फिरणं हे त्यांच्यासाठी सामान्य होऊन जातं. पण या सर्व गोष्टी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. सुट्टीत अनेक सेलिब्रिटी हे परदेशात फिरायला जातात. पण एक अभिनेत्रीने चक्क गावची जत्रा फिरायला आली आहे.
ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून हेमांगी कवी आहे. हेमांगी कवीने आपल्या अभिनयाने मनोरंजनसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ती सोशल मीडियावरही खुप सक्रीय असते. अनेकदा ती वेगवेगळे फोटो पोस्ट करताना दिसत असते. आता तिने काही दिवसांसाठी कामातून ब्रेक घेतला आहे.
हेमांगी कवी आता एक यात्रा फिरण्यासाठी गेली आहे. तिने कामातून ब्रेक घेत थेट तिचे गाव गाठले आहे. ती तिच्या गावी साताऱ्यातील म्हसवड येथे सुट्टी साजरी करत आहे. म्हसवड येथे भरणाऱ्या सिद्धनाथांच्या यात्रेत ती सहभागी झाली. त्यावेळी तिथे काढलेले फोटो आणि व्हिडिओ हेमांगी कवीने शेअर केले आहे.
सिद्धनाथांच्या यात्रेमध्ये हेमांगी भक्तीभावानं सहभागी झाली होती. यावेळी मंदिरात जाऊन तिने सिद्धनाथांच्या पादुकांचंही दर्शन घेतलं होतं. त्यानंतर पालखीतही ती होती.त्याचे फोटो हेमांगी कवीने शेअर केले आहे. तसेच यात्रेतील खाद्य पदार्थांचाही आस्वाद तिने घेतला आहे.
यात्रेला जाण्याआधीत हेमांगीने एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तिने तिचा कारमधला फोटो पोस्ट केला होता. ती म्हणाली होती की, लोकं सुट्टी एंजॉय करण्यासाठी गोव्याला जातात, पण गावाला जातो, सिद्धनाथ यात्रा कॉलिंग. ही पोस्टही सोशल मीडियावर खुप व्हायरल झाली होती.
आता त्यानंतर हेमांगीने यात्रेतील काही फोटो पोस्ट केले आहे. या रंगात रंगायची मज्जाच वेगळी आहे, असे कॅप्शन लिहीत तिने इंस्टाग्राम पोस्ट केली आहे. तसेच तिने यावेळी तिने एक व्हिडिओही पोस्ट केली आहे. त्यामध्ये तिने तिच्या गावाची सर्व माहिती दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
उमरान मलिकने पदार्पणाच्या सामन्यातच सुरू केला कहर, पहील्याच चेंडूचा वेग पाहून सगळे हादरले
‘या’ कारणामुळे अमृता फडणवीस १०० वर्षे म्हाताऱ्या होणार नाहीत; रामदेव बाबांची भविष्यवाणी
Surekha Punekar : अपुरे कपडे घालून अश्लील हावभाव करत नाचने याला लावणी म्हणत नाहीत; गौतमीवर भडकल्या सुरेखा पुणेकर