भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने त्यांचे कुटुंबीय, चाहत्यांसोबत सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. लतादीदी आता आपल्यात नाहीत, ही गोष्ट पचवणे अनेकांना कठिण होता आहे. त्यांच्या आठवणीत प्रत्येकजण भावूक होत आहे. अनेक सेलिब्रिटीही लतादीदींसोबतचे त्यांच्या आठवणी शेअर करत आहेत. यादरम्यान, मराठी अभिनेत्री हेमांगी कवीनेही लतादीदींसंदर्भातला तिचा एक किस्सा सांगत दीदींच्या आठवणीत भावूक झाली (Hemangi Kavi Look As Lata Mangeshkar)आहे.
हेमांगीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये हेमांगी लतादीदींच्या भूमिकेत दिसत आहे. पांढरी साडी, डोक्यावरून पदर घेतलेला, कपाळी लाल टिळा अशा रूपात हेमांगी अगदी लता मंगेशकर यांच्याप्रमाणे दिसत आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले की, दोन तीन वर्षांपूर्वी एका प्रोजेक्टनिमित्त लताजींच्या भूमिकेसाठी मी एक ऑडिशन/लूक टेस्ट दिली होती.
‘ते प्रोजेक्ट उदयास आलं नाही पण अगदी काही क्षणांसाठी त्यांचं अनुकरण, गाण्यातून नाही (जे खरंतर माझ्यासारख्या अति सामान्य कलाकारासाठीच काय तर कुठल्याच जन्मात कुणालाही अशक्यप्राय अशी गोष्ट आहे) पण निदान लूकमधून साकारता आलं. याचा मला काय तो आनंद झाला होता उफ्फ….! खूप मनापासून हा लूक मी करून गेले होते!’
हेमांगीने पुढे गुलजार यांचे गीत लिहिले की, ‘आज अगर भर आई है बूंदे बरस जाएंगी…कल क्या पता इनके लिए आँखें तरस जाएगी… जाने कब गुम हुआ, कहाँ खोया… इक आंसू छुपा के रखा था…. वो एक आंसू आपके लिए छुपा के रखा था और हमेशा रहेगा! मैं, मेरी आँखे हमेशा आपके लिए तरस्ती रहेंगी!’ दरम्यान, हेमांगीचा हा फोटो पाहून अनेकजण कमेंट करत ती अगदी लतादीदींसारखी साम्य दिसत असल्याचे सांगत आहेत. तसेच तिच्या या लूकमुळे तिचे कौतुकही करत आहेत.
दरम्यान, नुकतीच काही दिवसांपूर्वी हेमांगी माध्यमात फारच चर्चेत आली होती. लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारवेळी एकही मराठी कलाकार दिसला नाही, असे म्हणत काही नेटकऱ्यांनी मराठी कलाकारांना ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर अशाच एका नेटकऱ्याच्या पोस्टवर अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट करत लता मंगेशकर यांच्या अंत्यदर्शनाला मराठी कलाकार उपस्थित नसण्यामागचे स्पष्टीकरण दिले होते.
https://www.facebook.com/hemangii.kavidhumal/posts/5392491960770389
नेटकऱ्याच्या पोस्टवर कमेंट करताना तिने लिहिले होते की, ‘सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले. शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांनाही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!’
तिने पुढे लिहिले की, आम्ही तिथे कुणी सेलिब्रिटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं!
महत्त्वाच्या बातम्या :
‘गहराइयां’ च्या स्क्रिनींगला पोहोचलेल्या कपिलने पत्नीला कॅमेऱ्यासमोरच पत्नीला केले किस, पहा व्हिडीओ
जेव्हा गंगूबाई काठियावाडी यांनी जवाहरलाल नेहरूंना केले होते प्रपोज, वाचा पुर्ण किस्सा
..जेव्हा लतादीदींनी शाहरूखबद्दल सांगितली होती ‘ही’ गोष्ट, शाहरूखच्या ट्रोलर्सनी हे नक्कीच वाचलं पाहिजे