आपल्या गाण्यांनी सर्वांना वेड लावणाऱ्या लता मंगेशकर (lata mangeshkar) आता आपल्यात नाहीत. आवाजाने सर्वांची मने जिंकणाऱ्या लता मंगेशकर यांचा आवाज कायमचा नि:शब्द झाला आहे. रविवारी सकाळी लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच हादरवून सोडले. रविवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी अनेक मान्यवर शिवाजी पार्क येथे दाखल झाले होते. अक्षय कुमारपासून ते भूमी पेडणेकर, निमृत कौर, विशाल ददलानी, दिया मिर्झा आणि हंसल मेहतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी लताजींना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य राजकीय नेत्यांनी देखील दीदींच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.
मात्र लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार उपस्थित का नव्हते? असा सवाल सध्या सोशल मिडियावर नेटकरी विचारत आहेत. नेटकऱ्यांच्या याच प्रश्नांचे उत्तर अभिनेत्री हेमांगी कवी हिने दिले आहे. ‘सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. मी खूप विनंती केली,’ असे हेमांगीने म्हंटले आहे.
पोस्टमध्ये हेमांगी म्हणतीये, ‘आम्ही तिथे सेलिब्रिटी म्हणून गेलो नव्हतो निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हाला शासकीय प्रोटोकॉल्स कळतात. म्हणून तिथे थांबवून होतो. पण आम्हाला सांगण्यात आलं की वेळ नाहिये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरश: भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं. कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कोणी आलं नसावं.’
सध्या हेमांगीची ही पोस्ट तूफान व्हायरल होतं आहे. पुढे पोस्टमध्ये ती म्हणतीये, ‘नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर आम्ही चार वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हाला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. तसेच शैलेंद्र सिंह, बेला शेंडे आणि कविता पौडवाल यांना देखील मागे हटवण्यात आलं, तिथं माझी काय गत.’
दरम्यान, लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्या न्यूमोनिया या आजाराशीही झुंज देत असल्याचे डॉक्टरांद्वारे सांगण्यात आले. तब्बल २७ दिवस रूग्णालयात दाखल राहिल्यानंतर लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.
लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे राजकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साश्रूनयनांनी त्यांचा भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर यांनी त्यांना मुखाग्नी दिला. हा क्षण प्रत्येकासाठी भावूक करणारा होता. लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली असून देशात दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहिर करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रातही सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! असदुद्दीन ओवेसींच्या दीर्घायुष्यासाठी समर्थकांकडून 101 बकऱ्यांचा बळी; वाचा संपूर्ण प्रकरण
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बाळाला स्तनपान देताना कारने चिरडले; वाचून तुम्हीही ढसाढसा रडाल
भारताला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या रशीदच्या यशामागे आहे ‘ही’ व्यक्ती; घेतलेले कष्ट वाचून डोळ्यात पाणी येईल
लतादीदींसाठी खुपच खास होता प्रभुकुंज, त्यांच्या घरातील ‘हे’ खास फोटो पाहिलेत का?