Share

लता मंगेशकरांच्या अंत्यसंस्काराला मराठी कलाकार का उपस्थित नव्हते? हेमांगी कवीने दिले स्पष्टीकरण

Lata Mangeshkar Funeral

गानसरस्वती भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) अनंतात विलीन झाल्या आहेत. रविवारी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार (Lata Mangeshkar Funeral) करण्यात आले. यावेळी क्रीडा, मनोरंजन, उद्योग, राजकारण तसेच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिथे उपस्थित राहत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी सर्वांनी साश्रूनयनांनी लता मंगेशकर यांना निरोप दिला.

यादरम्यान, लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी मराठी कलाकार कुठे गेले? असा प्रश्न सोशल मीडियावर काही नेटकऱ्यांकडून विचारण्यात आला. त्याला अनुमोदन देत अनेकांनी मराठी कलाकारांवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) या टीकांवर उत्तर देत लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी मराठी कलाकार का दिसले नाही, याचे स्पष्टीकरण दिले आहे.

https://www.facebook.com/mayurmaddkar/posts/4585439084898918

फेसबुकवर एका नेटकऱ्याने लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी शिवाजी पार्क येथे मराठी कलाकारांना बंदी होती का? असा प्रश्न विचारला. या नेटकऱ्याच्या पोस्टवर कमेंट करत हेमांगीने लिहिले की, ‘सरकारी प्रोटोकॉल्स आड आले. मला गेटमधून जाऊ दिलं नाही. खूप विनंती केली. मला या गेटवरून त्या गेटवर जा म्हणत राहिले’.

‘शेवटी एका पीएसआय साहेबांना माझी दया आली आणि मला लपून लपून कसा बसा प्रवेश मिळवून दिला. नंदेश उमप, मी आणि अभिजीत केळकर ४ वाजल्यापासून तिथं होतो. शेवटपर्यंत आम्हांला विनंती करूनही दर्शन मिळत नव्हतं. संगीताचे खरे वारसदार गायक शान, शैलेंद्र सिंग, बेला शेंडे, कविता पौडवाल यांनाही मागे हटकलं जात होतं, तिथं माझी काय गत!’

तिने पुढे लिहिले की, ‘आम्ही तिथे कुणी सेलिब्रिटी म्हणून गेलोच नव्हतो. एक निस्सीम रसिक म्हणूनच गेलो होतो. आम्हांला ही शासकीय प्रोटोकॉल्स कळत होते. म्हणून थांबून होतो. पण नंतर आम्हांला सांगितलं वेळ नाहीये आता जवळून दर्शन मिळणार नाही. अक्षरशः भांडून आम्ही शेवटचं दर्शन घेतलं! कदाचित याची कल्पना काही लोकांना असावी म्हणून कुणी आलं नसावं!’

दरम्यान, लता मंगेशकर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबीयांसोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता शाहरूख खान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हेसुद्धा शिवाजी पार्कवर येथे पोहोचून लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
VIDEO: …अन् लग्नाच्या वरातीत मनसोक्त नाचले धनुभाऊ, पहा झिंगाट डान्सचा भन्नाट व्हिडीओ
अखेर ठरलं! रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बांधणार लग्नगाठ? ‘या’ ठिकाणी होणार थाटामाटात लग्न
तारक मेहता मधील बबिताला अटक, चार तास कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी…

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now