Rekha: मध्यरात्री रेखाला ‘अशा’ अवस्थेत पाहून हेमा मालिनीला बसला होता धक्का, घाबरून विचारला ‘हा’ प्रश्न

Birthday, Rekha, Hema Malini, Marriage, Mukesh Agarwal/ दिग्गज अभिनेत्री आणि बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेली रेखा (Rekha) 68 वर्षांची झाली आहे. ती 10 ऑक्टोबरला तिचा 68 वा वाढदिवस साजरा करणार आहे. तिचा जन्म 1954 मध्ये चेन्नई येथे झाला. लहानपणापासूनच रेखाचे आयुष्य वादांनी वेढलेले होते आणि आजही तिच्याबद्दल अनेक गोष्टी घडत आहेत. अभिनयासह तिच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेखाच्या अफेअर्सचे किस्से काही कमी नव्हते.

अनेक नावं जोडल्यानंतर रेखाने अखेर दिल्लीस्थित व्यापारी मुकेश अग्रवालशी लग्न केलं. 1990 मध्ये रेखाने मुकेशला जीवनसाथी बनवले होते जेव्हा तिची कारकीर्द शिखरावर होती. एका रात्री तिने मंदिरात मुकेशसोबत गुप्त लग्न केले आणि तेथून थेट हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचली. हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचल्यानंतर काय झाले आणि रेखाला या अवस्थेत पाहून ड्रीम गर्लची काय प्रतिक्रिया होती आज आपण जाणून घेणार आहोत.

यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: अॅन अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखाच्या आयुष्याशी संबंधित अनेक कथा आहेत. त्यांच्यामध्ये रेखा आणि मुकेश अग्रवाल यांच्या लग्नाचाही एक किस्सा आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की रेखाने मुकेशसोबत लग्न करण्याचा निर्णय घेण्याची घाई केली नाही.

‘रेखा: एन अनटोल्ड स्टोरी’मध्ये, रेखा-मुकेश अग्रवाल यांची दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान भेट झाल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला रेखाने मुकेशकडे फारसे लक्ष दिले नाही, पण हळूहळू ती त्याच्या जवळ येऊ लागली. मुकेशही रेखाला भेटण्यासाठी वारंवार मुंबईत येऊ लागला. लेखक यासिर उस्मान यांनी पुस्तकात नमूद केले आहे की, तो दिवस आला जेव्हा मुकेश विशेषतः मुंबईत आला आणि रेखासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. रेखाने क्षणाचाही विलंब न लावता हा प्रस्ताव स्वीकारला आणि मग पटकन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रेखा आणि मुकेश अग्रवाल रात्री 10.30 नंतर मुंबईतील मंदिरात पोहोचले, पुजाऱ्याला उठवून लग्नाची सर्व तयारी करून घेतली आणि त्यानंतर सात फेरे घेऊन दोघांनीही अत्यंत साध्या पद्धतीने लग्न केल्याचे पुस्तकात नमूद आहे. लग्न झाल्यानंतर मुकेश अग्रवालला त्याची मैत्रिण दीप्ती नवलच्या घरी जायचे होते, पण रेखाला तिची खास मैत्रिण हेमा मालिनीच्या घरी जायचे होते. खरे तर दोघीही साऊथच्या होत्या आणि दोघींमध्ये खास नाते होते.

मध्यरात्री रेखा पतीसोबत हेमा मालिनी यांच्या घरी पोहोचली. रेखाच्या भांगात कुंकू आणि गळ्यात वरमाळा पाहिल्याबरोबर हेमा लगेच म्हणाली, आता तू त्याच्याशी लग्न केलेस असे म्हणू नकोस. पण रेखाचा होकार ऐकून तिला धक्काच बसला. मग हेमाने रेखाच्या कानात विचारले, त्याच्याकडे खूप पैसे आहेत का, तो खूप श्रीमंत आहे. मात्र, हेमाच्या प्रश्नावर रेखाने फक्त स्मितहास्य केले.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की रेखा आणि मुकेश अग्रवाल यांचे लग्न केवळ 9 महिने टिकले होते आणि एके दिवशी मुकेशने रेखाच्या दुपट्ट्याने गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर मीडियाने रेखाला सोडले नाही. रेखाबद्दल अनेक कथा प्रसिद्ध झाल्या. लोकांना उत्तरे देऊन ती कंटाळली आणि त्यानंतर ती गप्प बसली.

रेखाने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरची सुरुवात साऊथ चित्रपटातून केली होती. हळुहळू तिला बॉलिवूड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1970 मध्ये सावन भादो या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सुरुवातीचा टप्पा तिच्यासाठी चांगला नव्हता, पण नंतर तिने आपले काम गांभीर्याने घेतले आणि वेगळी ओळख निर्माण केली.

रेखाने आपल्या करिअरमध्ये 180 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. तिने बॉलिवूडच्या प्रत्येक सुपरस्टारसोबत स्क्रीन शेअर केली. तिचे अनेकांसोबत अफेअर्सचे किस्सेही प्रसिद्ध आहेत. जितेंद्र, विनोद मेहरा ते नवीन निश्चल, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांच्याशी तिचे अफेअर होते. मात्र, तिचे नाते कोणाशीही जुळले नाही.

महत्वाच्या बातम्या-
आज माझी मुलगी असती तर..; एकट्या राहणाऱ्या अभिनेत्री रेखाने का व्यक्त केली खंत? वाचा…
..त्यामुळे शशी कपूर कधी रेखासोबत काम करण्यास नव्हते तयार, नंतर डझनभर चित्रपटात केले काम
Amitabh Bachchan: रेखा किंवा जया नाहीये अमिताभ यांचे पहिले प्रेम, ‘या’ बंगाली तरूणीवर फिदा झाले होते बीग बी