आपल्या स्वप्नांचा वेध घेणाऱ्या, उद्योग क्षेत्रात धडपडणाऱ्या अनेकांचे स्वप्न असते की, एकदा तरी रतन टाटा त्यांचे मार्गदर्शन लाभावे अथवा त्यांची भेट व्हावी. हेच स्वप्न पुण्यातील न्यू स्टार्टअप करणाऱ्या २ व्यक्तींचे पूर्ण झाले. ही भन्नाट स्टोरी आपण जाणून घेऊया. (Hello, I am Ratan Tata! One phone changed the life of two youths in Pune)
पुण्यातील मोबाईल एनर्जी डिस्ट्रीब्यूशन स्टार्टअप रेपोज एनर्जी यांचे नशीब एका क्षणात बदलले. पुण्यातील रेपोज एनर्जीने नुकतेच ऑरगॅनिक कचऱ्याचे व्यवस्थापन करणारे व्हेइकल लॉन्च केले. या स्टार्टअपचे अदिती वाळुंज आणि चेतन वाळुंज यांनी रतन टाटांना भेटण्याचा अनुभव सांगितला आहे.
अदिती आणि चेतन वाळुंज यांचे स्वप्न होते की, रतन टाटांशी एकदा भेट व्हावी. ते स्वप्न सत्यात उतरेल याची त्या दोघांना कल्पना नव्हती. त्या दोघांनी एका प्रोजेक्टचे थ्रीडी प्रेझेंटेशन तयार करून ठेवले व एक पत्र रतन टाटा यांना पाठवले. त्या पत्राची खूप दिवस वाट पाहून सुद्धा उत्तर आले नाही.
आदिती आणि चेतन यांनी रतन टाटा यांच्या घरी जाण्याचे ठरवले. रतन टाटा यांची भेट घेण्यासाठी घराबाहेर १२ तास थांबून वाट पाहिली. परंतु त्यांची भेट होऊ शकली नाही. निराश झालेले अदिती आणि चेतन हे दोघे पुन्हा हॉटेलवर परत आले. पण अचानक अदितीचा फोन खणखणला.
अदितीने फोन उचलताच दुसऱ्या बाजूने आवाज आला. ‘मी अदितीशी बोलू शकतो का?’ त्यावर अदितीने उत्तर दिले, ‘होय, मी अदिती बोलत आहे. आपण कोण?’ दुसऱ्याबाजूने ‘मी रतन टाटा बोलतोय,’ असं ऐकून अदितीला आश्चर्याचा धक्का बसला.
दुसऱ्याच दिवशी रतन टाटांसोबत मीटिंग फिक्स झाली. त्यानंतर ३ तास चर्चा झाली आणि नव्या स्टार्टअपमध्ये रतन टाटा यांनी रस घेतला. टाटा समूहाने २०१९ ,२०२२ साली स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे रेपोज एनर्जी वेगळ्या उंचीवर जाऊन आज पोहोचली आहे. पण रतन टाटांची ती भेट आणि त्यानंतरचा यशाचा वाढता आलेख यामुळे त्या एका भेटीची चर्चा उद्योग क्षेत्रात चर्चेचा विषय ठरते आहे.
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपचंच घर बिहारमध्ये फुटणार, चिराग पासवान यांनी दिले संकेत
शिवसेनेकडून काँग्रेसची स्तुती पण थेट शरद पवारांवर निशाणा, सामनातील अग्रलेखाची राज्यभर चर्चा
आता शिवसेनेने राष्ट्रवादी फोडली! राष्ट्रवादीच्या आमदाराच्या भावाचा शिवसेनेत प्रवेश; उद्धव ठाकरे म्हणाले…