अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या एका व्यक्तीने आपल्या निर्णयाने पुन्हा एकदा लोकांची मने जिंकली आहेत. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सावजी ढोलकिया (Savji Dholakia) यांना हेलिकॉप्टर भेट म्हणून मिळाले होते, मात्र त्यांनी हे हेलिकॉप्टरही जनतेच्या सेवेसाठी दान केले आहे. हरी कृष्ण हीरा कंपनीचे मालक सावजी ढोलकिया यांनी उचललेल्या या पाऊलानंतर लोक त्यांचे सर्वत्र कौतुक करत आहेत. त्यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हे हेलिकॉप्टर भेट दिल्याची माहिती आहे.(Savji Dholakia, Padma Shri Award, Helicopter, Donation)
सावजीच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या कुटुंबाने त्यांना एवढी मोठी भेटवस्तू देण्याची योजना आखली होती हे त्यांना माहीत नव्हते आणि त्यांनी समाजसेवेसाठी मनापासून देणगी दिली असली तरी कुटुंबाने दिलेली ही भेट त्यांना नाकारायचीही नव्हती. सावजी ढोलकिया यांनी हे हेलिकॉप्टर सुरतमधील लोकांना वैद्यकीय तसेच इतर आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्याच्या उद्देशाने दान केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दान केलेल्या या हेलिकॉप्टरची किंमत ५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार सावजीने सांगितले की, ते सुरतमधील लोकांना हेलिकॉप्टर भेट देण्याचा विचार करत होते आणि अशा परिस्थितीत जेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून ही खास भेट मिळाली तेव्हा त्यांनी ते केले. कोणताही विलंब न करता जनतेची सेवा डोळ्यासमोर ठेवून निर्णय जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत असलेली पाहायला मिळत आहे.
सावजी ढोलकिया यांना सौराष्ट्रातील अमरेली जिल्ह्यातील लाठी तालुक्यात त्यांच्या मूळ गावी ७५ हून अधिक तलाव बांधण्याचे श्रेय जाते. हे सर्व तलाव ओसाड सरकारी जमिनीवर बांधण्यात आले आहेत. काही काळापूर्वी त्यांनी आपल्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भेट म्हणून ५०० कार, २८० घरे आणि ४७१ दागिन्यांचे सेट वाटप केले होते. लॉयल्टी कार्यक्रमांतर्गत कर्मचाऱ्यांना या भेटवस्तू मिळाल्याची माहिती आहे.
१९७७ मध्ये फक्त १२ रुपये बसला देऊन सुरतला आलेले सावजी आज हिरे उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. सावजीच्या कंपनीबद्दल बोलायचे झाले तर, तिथे ५५०० हून अधिक कर्मचारी आहेत आणि तिची उलाढाल ६ हजार कोटींहून अधिक आहे. सावजी यांनी सूरतमध्ये त्यांच्या काकांच्या हिऱ्यांच्या व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली आणि १० वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये त्यांची कंपनी स्थापन केली.
सध्या सावजी ढोलकिया यांची कंपनी मुंबईला हिरे तयार करून अमेरिका, बेल्जियम, यूएई, हाँगकाँग आणि चीन या देशांव्यतिरिक्त ५० हून अधिक देशांमध्ये थेट हिऱ्यांची निर्यात करते. तसेच सावजी आपल्या कर्मचाऱ्यांची नेहमीच काळजी घेत असलेले पाहायला मिळतात. ते त्यांच्या छोट-छोट्या कामांमधून समाजाची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतात.
महत्वाच्या बातम्या-
महाराष्ट्रातील ‘या’ केंद्रीय मंत्र्याचा मुलगा महाविकास आघाडीला मतदान करणार; राजकारणात खळबळ
रावसाहेब दानवेंचा आमदार मुलगा राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीला मतदान करणार
सगळ्या सहकाऱ्यांनी घेतली निवृत्ती पण 16 वर्षांपासून T20 मध्ये मैदान गाजवतोय हा भारतीय खेळाडू
ईडीने ठणकावले! देशमुख आणि मलिकांना मतदान करू देणार नाही, कैद्यांना मतदानाचा अधिकारच नाही