Share

चार दिवस अतिवृष्टी; राज्यात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस; पाहा हवामान खात्याचा अंदाज

देशभरात आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातं आहे. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या.. जयघोष सर्वत्र सुरू आहे. तर काही ठिकाणी वरुण राजाने देखील उपस्थिती लावली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हवामान खात्याने पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट भागात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

पुढील 3-4 दिवसांत वेगळ्या ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो, असे वेधशाळेने म्हटले आहे. पुढील चार दिवस मुंबईसह राज्यभरात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने आजच्या गणेश विसर्जनावर पावसाचे सावट असणार आहे. आज गणपती विसर्जन (Ganesh Immersion) आहे.

मात्र आज या गणेशभक्तांना पाऊस भिजवणार असल्याचा अंदाज आधीच पुण्याच्या हवामान विभागाने (India Meteorological Department) वर्तवला होता. यामुळे आता गणेश भक्तांना पावसाचा सामना करावा लागणार असल्याचं बोललं जातं आहे. मात्र गणेश भक्तांच्या आनंदात कोणताही फरक पडणार नाही.

पावसाचा अंदाज सांगताना हवामान खात्याने राज्यात येत्या 5 दिवसात मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त केला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजपासून मुंबई आणि ठाणे परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागात त्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बळीराजा शेतातील कामांना लागला आहे.

दरम्यान, पुढे हवामान खात्याने सांगितलं आहे की, ओडिशा, महाराष्ट्र व दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पुढील 4-5 दिवसांत मुसळधार पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पश्चिममध्य व लगतच्या पूर्वमध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत.

तर दुसरीकडे, बुधवारी मुंबईसह परिसरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर काल म्हणजेच गुरुवारी दुपारपर्यंत कडक ऊन पडले होते; मात्र सायंकाळी आकाशात काळे ढग दाटून आले अन् काही भागांत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाट देखील पाहायला मिळला.

महत्त्वाच्या बातम्या

…अन् संतापलेल्या इंदुरीकरांना अखेर धनंजय मुंडेंचं ऐकावंच लागलं; परळीत भर किर्तनात झाला राडा
…तर आम्ही राज ठाकरेंनाच बाहेर काढू; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने स्पष्टच सांगीतलं
‘आम्हाला नाही, तर तुम्हालाही नाही’, शिंदे गटाने आखली वेगळीच रणनीती, उद्धव ठाकरेंसमोरील अडचणींमद्धे वाढ
पीएसआय भरती घोटाळ्यात भाजप आमदाराने घेतले पैसे; स्वत: कबुली देतं केला मोठा खुलासा, ऑडिओ क्लिप व्हायरल
इतर ताज्या बातम्या राज्य शेती

Join WhatsApp

Join Now