Share

ह्रदयद्रावक! नवजात मुलीनंतर आता वडिलांचेही निधन, भारतीय क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर

सर्वांचा लोकप्रिय असणारा क्रिकेटपटू सध्या त्याच्या आयुष्यात अनेक संकटांशी सामना करत आहे. दहा दिवसांच्या अंतराने त्याने वडील आणि नवजात मुलीला गमावले आहे. तरीही एवढे सारे दुःख सहन करून तो क्रिकेट खेळण्यासाठी उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावत आहे.

हा क्रिकेटर म्हणजे, विष्णू सोलंकी आहे. तो बडोद्याचा आहे. सध्या त्याच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या परिस्थितीतही विष्णूने हिम्मत सोडलेली नाही. सर्वप्रथम त्याने आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. त्याने संघाप्रती असलेले कर्तव्य पार पाडल्याने सर्वजण त्याचे कौतूक करत आहेत.

दहा दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला होता. तो त्याचे दुःख सहन करत नाही तोवरच, त्याच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी भुवनेश्वर येथील कटकच्या मैदानावर तो खेळत होता. चंदीगड विरुद्ध सामना सुरू होता. त्याचवेळी त्याला बडोदा संघाचे मॅनेजर धर्मेंद्र आरोठे यांनी ड्रेसिंग रुममध्ये बोलावलं व त्याच्या वडिलांच्या निधनाची बातमी दिली.

त्यानंतर विष्णू ने ड्रेसिंग रुमच्या एका कोपऱ्यात बसून वडिलांवर होणारे अंत्यसंस्कार बघितले. बडोदा क्रिकेट संघटनेचे सचिव अजित लेले यांनी घरी परतण्याचा पर्याय दिला. पण त्याने संघासाठी सामना खेळण्याचा निर्णय घेतला. यावरून सर्वांना आश्चर्य वाटले.

वडिलांचा मृतदेह शवघरात फारवेळ ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे विष्णूच्या मोठ्या भावाने पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. विष्णूने हा सर्व अत्यंविधी ड्रेसिंग रुममधून व्हिडिओ कॉलवर पाहिला. अशा परिस्थितीत देखील विष्णू ने जो निर्णय घेतला त्याचे सर्व कौतूक करू लागले आणि सोबतच सर्वांना त्याच्या परिस्थितीवर दुःख देखील होत होते.

विष्णूच्या या निर्णयामुळे खेळ आणि संघाबद्दलची त्याची कटिबद्धता दिसून येते. विष्णू सोलंकीने चंदीगड विरुद्धच्या या सामन्यात 161 चेंडूत नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याच्या शतकी खेळीत 12 चौकार होते. दहा दिवसांपूर्वी विष्णूच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला होता. त्याचे दुःख सहन करत नाही तोवरच दुसरं दुःख त्याच्या पदरी पडलं.

इतर खेळ

Join WhatsApp

Join Now