Rahul Dravid : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी ट्वेंटी मालिका खेळला त्यानंतर साऊथ आफ्रिका संघासोबत टी ट्वेंटी मालिका झाली. त्या दोन्ही मालिकांमध्ये भारतीय संघाने उत्तम कामगिरी बजावली. मात्र सध्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी तयारीत असलेल्या भारतीय संघाला त्यांच्या एका उमद्या गोलंदाजाची कमी भासणार असल्याचे दिसते.
आता टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. दुसरीकडे शिखर धवनच्या नेतृत्वात वन डे मालिका साऊथ आफ्रिका संघाविरुद्ध खेळली जात आहे. या सगळ्या धामधुमीत भारतीय टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड याला भारताचा अष्टपैलू बॉलर जसप्रीत बुमराहची आठवण येत आहे.
भारतीय संघ साऊथ आफ्रिके विरुद्धचा शेवटचा सामना हरल्यानंतर राहुल द्रविडने पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती आमच्यासाठी नुकसानकारक ठरणार आहे. त्याच्या जागी आता दुसऱ्या खेळाडूला चांगली संधी आहे. मात्र प्रत्येक सामन्याला आम्हाला त्याची आठवण येत राहील.’
१५ तारखेला भारतीय क्रिकेट बोर्डाने जसप्रीत बुमराह टी ट्वेंटी विश्वचषक खेळणार नसल्याचे सांगितले. तेव्हा डेथ ओवर्समध्ये अडचणी निर्माण होत असलेल्या भारतीय संघाला मोठाच धक्का बसला. जसप्रीत बुमराह त्याच्या उत्तम खेळीमुळे भारतीय संघाचा आधार बनला होता. आता मात्र जसप्रीत बुमराह दुखापतीच्या कारणामुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या एशिया कपमध्ये तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये जसप्रीत बुमराहने आपल्या जबरदस्त खेळाने भारतीय संघासाठी लक्षणीय कामगिरी बजावली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा खेळता येणार नाही.
जसप्रीत बुमराह टी-ट्वेंटी विश्वचषकात खेळताना चाहत्यांना दिसणार नसल्यामुळे त्यांची मोठी निराशा झाली आहे. मात्र जसप्रीत बुमराहला दुखापतीतून बरं होण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी शुभेच्छा दिल्या. तसेच तो खेळत नसल्याने त्याची उणीव भासणार असल्याची खंत देखील व्यक्त केली.
महत्वाच्या बातम्या-
Prakash Ambedkar : “बाळासाहेब ठाकरेंमध्ये असलेला दिलदारपणा नरेंद्र मोदींमध्ये नाही”
Shinde group : दसरा मेळाव्याला निघालेल्या शिवसैनिकाचा रस्त्यातच हार्टॲटॅकने मृत्यू; अखेरचा निरोपही भगव्या शालीतच
Shinde group : “एक दुखावलेला बाप हात जोडून सांगतोय…”, मुलावरची टिका जिव्हारी लागलेल्या शिंदेंचं ठाकरेंना पत्र






