Share

जीवनावश्यक वस्तू फक्त त्याच व्यवसायिकाकडूुन खरेदी करेल, जो हिंदू धर्माचा…; हिंदू महासंघाने घेतली शपथ

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 139 वी जयंती आहे. या निमित्ताने हिंदू महासंघाने एक वेगळीच शपथ घेतली आहे. यामुळे आता राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मी माझ्या कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या बांधवांकडूनच घेईन,’ अशी शपथ त्यांनी घेतली आहे.

आधीच देशात धार्मिक मुद्यावरून वातावरण तापले आहे. त्यात हिंदू महासंघाने घेतलेल्या या अजब शपथीमुळे धार्मिक तेढ अधिकच वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. कुटुंबासाठी लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू हिंदू धर्माचा आदर करणाऱ्या बांधवांकडूनच घेणार अशी हिंदू महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शपथ घेतली.

तसेच, इतर लोकांनीही केवळ हिंदू धर्माचा सन्मान असणाऱ्या व्यावसयिकांकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहनही यावेळी हिंदू महासंघाकडून करण्यात आले आहे. हिंदू धर्माचा सन्मान करणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने ओळखण्यासाठी हिंदू महासंघाकडून संबंधित व्यापाऱ्यांच्या दुकानावर भगव्या रंगाचे स्टीकर लावले जाणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त एका नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘स्वतंत्र वीर सावरकर’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आहे.

महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून संदीप सिंह आणि अमित वाधवानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता रणदीप हुड्डा ‘सावरकर’ यांच्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. लवकरच या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.

आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील वीर सावरकर यांचे वास्तव्य असलेली खोली उघडण्यात आली होती. पुण्यातील सावकरप्रेमी याठिकाणी सावरकरांना अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी जमले होते.

राजकारण

Join WhatsApp

Join Now