नात्यामध्ये संशय निर्माण झाला की सर्वकाही संपायला एक क्षणही पुरेसा असतो. मुख्य म्हणजे या संशयाचा पाठपूरावा करण्यासाठी जोडीदार कोणत्याही थराला जायला तयार असतो. अशीच एक घटना अमेरिकेत घडली आहे. गर्लफ्रेंडवर असलेल्या संशयामुळे तरुणाने असे काही केले आहे की यामुळे पोलीसही थक्क झाले आहेत.
अमेरिकेत राहणाऱ्या लॉरेन्स वेल्शचा आपल्या गर्लफ्रेंडवर अजिबात विश्वास उरला नव्हता. त्यामुळे त्याने गर्लफ्रेंडला स्टॉक करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा तरुण ऍपल वॉचच्या मदतीने आपल्या गर्लफ्रेंडला स्टॉक करत होता. अॅपल एअरटॅग ट्रॅकर वापरून गर्लफ्रेंडला स्टॉक करण्याचे काम या तरुणाचे सुरु होते.
मध्यंतरी लॉरेन्स वेल्श फॅमिली सर्व्हिस सेंटरमध्ये आला होता. पण आत जाण्याऐवजी तो गर्लफ्रेंडच्या कारजवळ गेला. तिथे जाऊन तो समोरच्या ड्रायव्हरच्या बाजूच्या सिटच्या टायरजवळ बसला. त्यामुळे ड्रायव्हरला लॉरेन्स वेल्शवर संशय आला. ड्रायव्हरने त्वरीत पोलिसांना त्या ठिकाणी बोलवून घेतले.
त्यामुळे लॉरेन्स वेल्श करत असलेले सर्व कृत्य उघडकीस आले. वेल्शने अनेकदा आपल्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याच्या सततच्या संशयाला गर्लफ्रेंडही कंटाळली होती. मात्र या संशयामुळे वेल्श या थराला जाईल याची तिला कल्पना नव्हती.
सांगण्यात येते की, ऍपल वॉचच्या एअरटॅग ट्रॅकर या फीचरच्या मदतीने कोणाचाही पाठलाग करता येतो. लॉरेन्स वेल्शने आपल्या गर्लफ्रेंडच्या टायरच्या स्पोकवर ऍपल वॉच फिक्स केले. याच्या आधारेच तो आपल्या गर्लफ्रेंडवर बारीक लक्ष ठेवून होता. या ऍपल वॉचमुळे गर्लफ्रेंड कुठे जाते, कोणाला भेटते याची माहिती वेल्शला मिळत होती.
आता हा सर्व प्रकार उघडकीस आल्यामुळे पोलिसांनी वेल्शवर घरगुती अत्याचाराचे गुन्हे दाखल केले आहेत. तसेच लवकरच त्याला या प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या
प्रसूतीनंतरही महिलेच्या पोटात होत होत्या प्रचंड वेदना, शस्त्रक्रियेनंतर सगळ्यांना बसला जबर धक्का
‘मविआ’मधील नाराजीनाट्य थांबेणा! २५ काँग्रेस आमदार नाराज, अडीच वर्षे वाया गेल्याची भावना
RRR ची कमाई पाहून सलमान आला टेंशनमध्ये; म्हणाला, बाॅलीवूडचे चित्रपट साऊथमध्ये का चालत नाहीत?
मोहम्मद शमीच्या प्रेमात पडली ‘ही’ अमेरिकन पॉर्नस्टार, म्हणाली, ‘खुप छान कामगिरी केली’