पुण्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पती पत्नीच्या नात्याला कलंक लागणारी ही घटना आहे. एका व्यक्तीने स्वतः च्या पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. एवढेच नाही तर शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. या विचित्र घटनेमुळे परिसरात खळबळ जनक वातावरण निर्माण झालं आहे.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार पीडित महिलेने केली असून, तीचे वय 48 वर्षे आहे. पतीच्या या अश्लील कृत्याला कंटाळून तिने अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर एका मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.
त्यानंतर तिच्या सोबत आणखी एकदा असाच प्रकार घडला. म्हणजे जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरात एका फ्लॅटवर आणखी एका मित्रासोबत पत्नीला नराधम पतीने अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले, आणि हे सर्व होत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता.
पत्नीला हे सगळं असह्य झाल्यानंतर तिने आज भारती विद्यपीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपींना अटक केली की नाही यासंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र आजकाल माणसं आपल्या जवळच्या किंवा नातेसंबंधातल्या लोकांशी किती वाईट व्यवहार करू शकतात, याबद्दल लोकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
असे कृत्य करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास आगामी काळात असे घृणास्पद आणि विकृत गुन्ह्यांवर आळा घालणं शक्य होईल. या घटनेतील संबंधित महिलेविषयी सर्व काळजी व्यक्त करत आहेत. पुण्यातील या घटनेने मात्र पुणे परिसरात खळबळ उडाली आहे.