परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. शेतात आलेल पीक परतीच्या पावसामुळे गेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा आर्थिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे काही भागात पावसामुळे नुकसान देखील झालं आहे. अशातच बारामतीमधून एक वेगळी बातमी समोर येतं आहे.
एक तरुण ओढ्याच्या पाण्यात पडल्याने वाहत गेला आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवाळी सणाचा सर्वत्र जोरदार उत्सव सुरू आहे. असं असतानाच बारामती तालुक्यातील मुर्टी – मोरगाव रस्त्यावर सानिका हॉटेल येथे मुर्टी गावच्या हद्दीतील ओढ्याला अचानक पुर आला.
रस्त्यावर खूप पाणी आले होते. अशातच एक मोठी घटना घडल्याचे उघडकीस आले. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री बारा वाजता एक दुचाकीस्वार त्याच्या दुचाकीसह पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. काही क्षणात सर्वत्र या घटनेची जोरदार चर्चा सुरू झाली.
याबाबत मिळालेल्या महितीनुसार, पुरातून पोहून बाहेर निघत तो रांजणगाव गाठत बायकोला भेटला. सागर अरविंद पाटील असे या तरुणाचे नाव आहे. सागर यांची बायको प्रिया सागर पाटील यांना दिवाळीसाठी घरी घेऊन जाण्यासाठी जात होता. मात्र अचानक ओढ्याचा प्रवाह वाढला.
हॉटेल मॅनेजरने संबंधित व्यक्ती ओढ्यात वाहून गेला असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला दिली. त्यानंतर पोलिसांनी तरुणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान एक बाब समोर आली ती म्हणजे, तो तरुण पुराच्या पाण्यातून पोहून बाहेर निघाला आणि थेट बायकोजवळ रांजणगाव येथे पोहोचला असल्याच समजलं.
याबाबत तरुणाने सांगितलं की, रांजणगाव येथे माझी बायको कामाला आहे. तिला दिवाळीसाठी आणायला कऱ्हाड येथून उशिरा निघालो. ओढ्यात अचानक पाणी वाढल्याने मी पुराच्या पाण्यात वाहत गेलो. मी पोहत.. झाडाचा आधार घेत… बाहेर निघालो.. रांजणगाव येथे पोहोचलो.
Thackeray group : अखेर शिवसैनिकांनी बदला घेतलाच; बंडखोरांना गावागावात घेरलं अन् पाडलं तोंडघशी
Kolhapur : …मग तेव्हा का भाजपने राजकारणाची संस्कृती जपली नाही’; कोल्हापुरची वाघीन कडाडली
Telangana: चेकपोस्टवर भाजप नेत्याच्या कारमध्ये पोलिसांना सापडली नोटांची रास; विचारणा केली असता म्हणाला…