जॉर्जियामध्ये एका आईने आपल्या पाच वर्षांच्या मुलीला सेक्ससाठी विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर महिलेकडून मुलगी विकत घेणाऱ्या व्यक्तीनेच मुलीची हत्या केली. ‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार पोलिसांनी मंगळवारी ३५ वर्षीय क्रिस्टी सिपलला अटक केली. तिच्यावर मानवी तस्करी आणि खुनाचे आरोप करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रिस्टी सिपलने तिची मुलगी कॅमरी हॉलंड हिला काही रुपयांसाठी एका व्यक्तीला विकले. तिने सांगितले की तिला कॅमरीचा मृतदेह अलाबामाच्या फिनिक्स शहरात असलेल्या एका सुनसान घरात पडलेला आढळला. तिचा बेपत्ता झाल्याचा अहवालही काही काळापूर्वी दाखल झाला होता.
अटक होण्याआधी, क्रिस्टीने सांगितले की तिच्या मुलीच्या बेपत्ता आणि हत्येत तिचा कोणताही सहभाग नाही. ती म्हणाली, ‘मी आई आहे. मी असे काहीही केलेले नाही. तिच माझं आयुष्य होतं आणि मी तिच्यासाठीचं जगत होते. मलाही तीन मुले आहेत. पण माझं माझ्या मुलीवर खूप प्रेम होतं.’
क्रिस्टीने सांगितले की, तिचे पती कोरी हॉलंड यांच्याकडे कॅमरीचा ताबा होता आणि जेव्हा ती तिच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचली तेव्हा तिच्या पतीने तिला तेथून हाकलून दिले. क्रिस्टीने मीडियावर तिची प्रतिमा खराब केल्याचा आरोपही केला आहे. क्रिस्टी म्हणाली, मी निर्दोष आहे. मी काहीही चुकीचे केलेले नाही. मीडियानेही माझी इतकी बदनामी केली आहे की लोक मला दुष्ट स्त्री समजू लागले आहेत.
तर, पोलिसांचे म्हणणे आहे की क्रिस्टीने आपली मुलगी जाणूनबुजून एका पुरुषाला विकली. आरोपी क्रिस्टीशिवाय पोलिसांनी ३७ वर्षीय जेरेमी ट्रेमेन विल्यम्सलाही अटक केली आहे. त्याने कॅमरीचा गळा दाबून खून केला होता. पोस्टमार्टेमच्या अहवालात हेही उघड झाले आहे की, हत्येपूर्वी कॅरेमीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते.
त्याचवेळी कॅमरीच्या वडिलांनीही या सगळ्यासाठी क्रिस्टीला जबाबदार धरले. ते म्हणाले, “क्रिस्टीने हे करून मला सर्वात जास्त दुखावले आहे आणि आयुष्यभर वेदना दिल्या आहेत. मात्र पोलिसांनी तिला अटक केल्याचा मला आनंद आहे. आता आपण न्यायापासून फक्त एक पाऊल दूर आहोत.”