सध्या महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहेत. आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवीगाळ का केला म्हणून एका महिलेने जाब विचारला असता, तिचा विनयभंग करून लघवी पाजण्याचा प्रकार घडला आहे. घटनेने परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
संबंधित घटना ही पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. महिलेने शिवीगाळ केल्याचा जाब विचारला म्हणून आरोपींनी तिचा विनयभंग केला आणि लघवी बॉटलमध्ये जमा करून तिला पाजली. या प्रकरणी चार महिलांसह आठ जणांवरती गुन्हा दाखल झाला आहे.
संबंधित घटनाही 15 मे रोजी सुसगाव येथे घडली. मात्र, यासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात आता तक्रार करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घडलेली घटना सविस्तर म्हणजे, पीडित महिला तिच्या सासऱ्यासोबत चुलत सासऱ्यांकडे गेली होती. पीडित महिलेने आम्हाला शिवीगाळ का करीत आहात असा जाब त्यांनी विचारला.
त्यावेळी संतप्त झालेल्या आरोपींनी पीडीत महिला आणि सासऱ्याला काठी, चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका बाटलीमध्ये लघवी जमा करून ती पीडित महिलेला पाजली. महिलेच्या मनाला लज्जा प्राप्त होईल असं कृत्य आरोपींनी केले.
15 मे पासून पीडित महिला आणि तिचा सासरा पूर्णपणे तणावात होते. त्यानंतर त्यांनी धाडस करून पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींच्या विरोधात तक्रार दिली. आता पूर्वी वाद कशामुळे लागला होता, याची दाखल पोलीस घेणार आहेत. संबंधित प्रकरणाबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
या घटनेत महिलेसोबत असे निर्घृण कृत्य करण्यात चार महिलांचा देखील समावेश असल्याने, ही गोष्ट अधिक लज्जास्पद आहे. एक महिला दुसऱ्या एका महिलेसोबत असे कृत्य कसे करू शकते याचा प्रश्न पडला आहे. पुण्यात सध्या हा घटनेने खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.