साप म्हटलं की भल्या भल्यांची बत्ती गुल होते. साप मोठा असो किंवा छोटा, त्याला पाहिले तरी लोक घाबरतात. मात्र सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यात चक्क एक व्यक्ती सापाला त्याच्या ओंजळीने पाणी पाजत आहे. हा व्हिडिओ पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सर्वांना या गोष्टीचे आश्चर्य वाटत आहे.
सध्या सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडिओ सकारात्मक असतात तर काही व्हिडिओ नकारात्मक असतात. यासोबतच सोशल मीडियावर धाडसीपणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. साप म्हटलं की भले भले घाबरतात. मात्र, एका व्यक्तीने लांब शेपटीच्या सापाला ओंजळीने पाणी पाजल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सापांच्या अनेक प्रजाती आहेत. त्यामुळे त्याचे भयंकर आणि प्रचंड रूप पाहून अनेकांच्या अंगावर काटा येतो. असा भयंकर साप पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @snakes.empire या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताच नेटिझन्स भीतीने हादरले आहेत.
https://www.instagram.com/reel/CYcrdwAFCyL/?utm_source=ig_web_copy_link
हा व्हिडिओ इतका जबरदस्त आहे की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका मोठ्या सापाला ओंजळीने पाणी देताना दिसत आहे. एखाद्या पाळीव प्राण्याला जशी वागणूक दिली जाते तशीच वागणूक सापांना दिली जात असल्याचे या व्हिडिओत दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा साप त्या व्यक्तीचा पाळीव साप असू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
या व्हिडिओला 2 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला अनेक नेटकऱ्यांनी पसंती दिली आहे. @snakes.empire या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. एका यूजरने लिहिले की, ‘हा व्यक्ती मूर्ख आहे का, साप कधीच माणसाचा मित्र होऊ शकत नाही आणि त्याला पाणी देत आहे.’ तर दुसऱ्या यूजरने म्हटले की, विषारी सापही पाणी पिताना खूप सुंदर दिसतो.
आपल्या घरात साधारणपणे कुत्रा,गाय, शेळी, अशा प्रकारचे प्राणी पाळले जातात. साप पाळण्याचा कोणी स्वप्नात देखील विचार करत नाही. एखाद्या प्राणिसंग्रहालयामध्ये गेल्यावर तिथे देखील सापांच्या विविध प्रजातींना पाहण्याची हिम्मत देखील काहींमध्ये नसते. मात्र, या व्हिडिओ मधील व्यक्तीने चक्क साप पाळला आहे , आणि वरून त्याला ओंजळीने पाणी पाजत असल्याने सर्वजण पाहून आश्चर्य व्यक्त करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
आमिरच्या भाच्याने सर्वांसमोर केला होता चुही चावलाला प्रपोज; जुहीने दिले ‘असे’ खणखणीत उत्तर
अजय देवगनच्या मुलीचा ट्रान्सफॉर्मेशन लूक पाहून चाहते हैराण; पहा व्हायरल फोटो
‘विराट कोहलीला हटवण्यास गांगुलीच जबाबदार’; दिग्गज खेळाडूने उघडली बीसीसीआयची पोल