टी वर्ल्ड कप २०२२ च्या तयारीच्या दरम्यान, भारतीय संघाने १७ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने ऑस्ट्रेलियासमोर १७८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यादरम्यान टीम इंडियासाठी सूर्यकुमार यादव आणि लोकेश राहुल यांनी झंझावाती अर्धशतक झळकावले.
त्याचवेळी, पहिला डाव संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसनने भारताचा अष्टपैलू फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या खेळाबद्दल प्रतिक्रिया दिली. तो सुर्यकुमार यादवबाबत नेमका काय म्हणाला जाणून घेऊ.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सूर्यकुमार यादवने शानदार खेळी केली, याबद्दल ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन त्याचे कौतूक करताना दिसत आहे.
केन रिचर्डसन सुर्यकुमार यादव बाबत म्हणाला की, ‘सूर्यकुमार यादव हा सध्याच्या घडीला T२० मधील सर्वोत्तम फलंदाज आहे. ‘ सध्या केन रिचर्डसन याने केलेले सुर्यकुमार यादव बाबतचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुर्यकुमार यादवच्या चाहत्यांनी या व्हिडीओला प्रचंड पसंती दिली आहे.
दरम्यान, भारतीय संघाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या वेगळ्याच रंगात दिसत आहे. ICC T२० क्रमवारीत तो सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान या क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ICC T२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी सूर्यकुमार सध्या काही पाऊले दूर आहे.
१७ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात, प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने शानदार खेळ केला. या खेळीची खास गोष्ट म्हणजे भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने बॅटने जबरदस्त कामगिरी केली आहे. सलामीवीर राहुलच्या दमदार सुरुवातीनंतर भारत मजबूत स्थितीत होता. पण रोहित लगेच बाद झाल्यानंतर डाव फसला आणि माजी कर्णधार विराट कोहलीही जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही.
मात्र त्यानंतर मैदानात आलेल्या सूर्यकुमार यादवच्या झंझावाताने विरोधी गोलंदाजांची तारांबळ उडवली. त्याने ३३ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान ६ चौकार आणि १ आकाशी षटकारही दिसला. त्याच्या या दमदार खेळीमुळे भारताने ७ गडी गमावून १७८ धावांचे मोठे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते.