ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल…. हे कॅरेबियन बिग हिटर्स आहेत जे आतापर्यंत आयपीएलमध्ये तुमचे मनोरंजन करत आहेत. पण आता दिल्ली कॅपिटल्सच्या रोव्हमन पॉवेलचे (Rovman Powell) नावही लक्षात ठेवा कारण या खेळाडूने गुरुवारी रात्री सनरायझर्स हैदराबादविरुद्ध धावांची वावटळ आणली. अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक केले.(he has become the new sixer king of IPL)
आयपीएलमधील या मधल्या फळीतील फलंदाजाचे हे पहिले अर्धशतक होते. पॉवेलने सामन्यात 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. पॉवेलची सीजनची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. दोन सामन्यांत त्याला खातेही उघडता आले नाही, पण राजस्थान आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धचे सामने खेळल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. आज जरी तो आयपीएलमुळे विलासी जीवन जगत असला तरी त्याचे बालपण अत्यंत गरिबी आणि संघर्षात गेले आहे.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1522243054484160512?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1522243054484160512%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.aajtak.in%2Fsports%2Fipl-2022%2Fstory%2Frovman-powell-smashes-67-not-out-against-sunrisers-hyderabad-ipl-2022-dc-vs-srh-match-tspo-1458594-2022-05-06
IPL 2022 मधील शेवटचे 5 डाव
67*(35)
1*(2)
35(21)
33*(16)
35(15)
अशाप्रकारे, गेल्या पाच डावांमध्ये पॉवेलच्या बॅटमधून तब्बल 85.5 च्या सरासरीने आणि 190.0 च्या स्ट्राइक रेटने एकूण 171 धावा झाल्या आहेत.
पॉवेल त्याच्या आईच्या पोटात असताना, त्याच्या वडिलांना त्याला मारायचे होते, परंतु आईने हार मानली नाही आणि त्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला. रोव्हमनची आई लोकांच्या घरी कपडे धुत असत जेणेकरून त्यांना मुलांना शाळेत पाठवता यावे. नंतर या क्रिकेटपटूने आई आणि बहिणीला वचन दिले की तो लवकरच कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढेल. एका मुलाखतीत पॉवेलच्या आईने सांगितले की, तिचा मुलगा खूप खोडकर आहे पण तितकाच खूप हुशार आहे.
रोव्हमन पॉवेलने 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने (58 चेंडूत नाबाद 92) चौथ्या विकेटसाठी 122 धावांची अखंड भागीदारी केली आणि शेवटच्या पाच ओवरमध्ये 70 धावा केल्या. पॉवेलने मलिकच्या शेवटच्या ओवरमध्ये तीन चौकार आणि एका षटकारासह 19 धावा काढल्या.
पॉवेल 18 धावांवर खेळत असताना मलिकच्या चेंडूवर केन विल्यमसनने त्याला जीवदान दिले. नंतर पॉवेलने 17व्या ओवरमध्ये वेगवान गोलंदाज अॅबॉटच्या ओवरवर सलग दोन षटकार ठोकले. अशाप्रकारे रोव्हमन पॉवेलने एकूण पाच षटकार ठोकले. सध्या सोशल मिडीयावर रोव्हमन पॉवेलचे नाव चर्चेत आहे.
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल होणार रद्द? दिल्ली संघातील या खेळाडूला कोरोनाची लागण, सर्व खेळाडू क्वारंटाईन
बहिणीच्या निधनानंतर भावूक झाला हा आयपीएल खेळाडू, म्हणाला, मला नेहमी तुझी आठवण येत राहील
झाडू मारण्याचे काम सोडून बनला क्रिकेटपटू; आज आयपीएलमध्ये घालत आहे धुमाकूळ
आयपीएलच्या पैशामुळे तुटली अँड्र्यु सायमंड्स आणि मायकल क्लार्कची दोस्ती, वाचा नेमकं काय घडलं होतं?