Share

‘शेर शिवराज’ चित्रपटात अफजल खानाच्या भूमिकेत दिसणार बॉलिवूडचा ‘हा’ अभिनेता

sher shivray

2022 या वर्षात कलाविश्वाने प्रेक्षकांना अक्षरश: चित्रपटांची मेजवानी दिली आहे. एका पाठोपाठ उत्तम कथानक आणि आशय असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आता आणखी एक नवीन चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. त्याच नाव ‘शेर शिवराज’ असून येत्या 22 एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘पावनखिंड’ चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर ‘शेर शिवराज’ चित्रपटाचं काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. काही दिवसांपूर्वी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल सेनेच्या पराक्रमाची गाथा आपल्याला पाहायला मिळाली. फर्जंद, फत्तेशिकस्तनंतर दिग्पाल यांच्या शिवराज अष्टकातील हा तिसरा चित्रपट होता.

आता ‘शेर शिवराज’ चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझल खानाचा वध कसा केला हे पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध करून त्याच्या सैन्याचा दणदणीत पराभव केला होता. याचीच गोष्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे.

नुकतेच ‘शेर शिवराज’ या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर आणि पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या सोशल मीडियावर शेर शिवराजच्या टीझरची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटाची माहिती दिली होती.

चिन्मय मांडलेकरने व्हिडीओ पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली जेव्हा महाराष्ट्र भरडला, अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कणाकणांतून बाहेर पडला, सहस्त्र हातांचा अजस्त्र नरसिंह… शेर शिवराज २२ एप्रिल २०२२…हर हर महादेव.’ या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका चिन्मय मांडलेकरने साकारली आहे.

शेअर करण्यात आलेल्या टीझरमध्ये अफझल खानची छोटीशी झलक पाहायला मिळते. त्यामुळे अफझल खानच्या भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. अफझल खानाची भूमिका कोण साकारणार आहे याचा खुलासा केलेला नाही. मात्र तरीही बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मुकेश ऋषी हे अफझलची भूमिका साकारताना दिसणार असल्याची चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘अमिताभसारखा मोठा सेलिब्रिटी आंबेडकरांच्या पाया लागतो हे भाजपच्या लोकांना खटकलंय का?’
निखील वागळेंनी नागराज मंजुळेच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप, म्हणाले, बाबासाहेबांचे बोट धरून..
समाज एकत्र असताना दुरावा निर्माण होईल असे चित्रपट करू नये; कश्मीर फाईल्सबद्दल पवारांचे परखड मत
चीनचे विमान १३३ प्रवाशांसह डोंगराळ भागात कोसळले; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ आला समोर

इतर ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now