Share

Pune : माझ्यासोबत संबंध ठेव नाहीतर.., शिक्षकाची विद्यार्थिनीला धमकी, पुण्यातील धक्कादायक प्रकार

sexual assault

Pune: पुणे आणि परिसरातून दिवसेंदिवस हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहेत. अशातच एका शिक्षकाने ‘माझ्यासोबत संबंध नाही ठेवलेस तर, तुझे ते फोटो व्हायरल करेन’ अशी धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात एकच खळबळ माजली.

सिंहगड परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पीडित तरुणीने यासंबंधी सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षकाने तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी देईल, असे देखील तरुणीला म्हंटले होते.

नितीश सुडके उर्फ हर्षवर्धन लक्ष्मण पाटील (वय २८, रा. हिंगणे, सिंहगड रस्ता पुणे) असे शिक्षकाचे नाव आहे. पाटील हा खाजगी कोचिंग क्लासेस घेत येत असून त्यामध्ये गणित शिकवायचा. तरुणी त्याच्याकडे गणित शिकण्यासाठी जात होती. त्यादरम्यान एक वर्षांपूर्वी या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.

परंतु तरुणीच्या घरच्यांनी तिचे लग्न इतर कोणाशी जुळवल्याने तिने त्या शिक्षकाला यापुढे संबंध संपल्याचे सांगितले. मात्र तो वारंवार भेटण्याची मागणी करू लागला. तसेच पीडित तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्याला फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित तरुणी २१ वर्षांची आहे. दुसऱ्या ठिकाणी लग्न ठरल्यानंतर संबंध संपवण्याची गोष्ट त्या तरुणीने शिक्षकाकडे बोलून दाखवली. मात्र त्याने ‘माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीस तर, तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करेल’, अशी धमकी दिली.

तरुणीने नकार दिल्यानंतर सुद्धा तो पुन्हा भेटतच राहिला. त्यादरम्यान त्याने तरुणीला स्पर्श करून अश्लील चाळे केले. अनेक वेळा त्याने तरुणीचा पाठलाग केला. या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणीने पोलिसांमध्ये तक्रार केली. त्यानंतर या शिक्षकावर पोलिसांनी कारवाई केली आहे.

महत्वाच्या बातम्या-
Sambhaji Raje : संभाजीराजे बोलूच देत नाहीत, कोणी काही बोललं की देतात ‘ही’ धमकी, मराठा क्रांती मोर्चाचा आरोप
Aditya Thackeray : आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी दिला उजाळा, ‘तो’ खास फोटो केला शेअर
Nitish Kumar : अखेर बदला घेतलाच! साथ सोडणाऱ्या नितीश कुमारांना भाजपचा दणका

ताज्या बातम्या इतर क्राईम

Join WhatsApp

Join Now