बजरंगी भाईजान(Bajrangi Bhaijan) या नावाने प्रसिद्ध असलेले हरियाणा(Hariyana) पोलीस दलातील एएसआय राजेश कुमार यांनी पुन्हा एका बेपत्ता मुलीची तिच्या नातेवाईकांशी भेट घडवून दिली आहे. ही दिव्यांग (Disabled) मुलगी हरियाणामधील अंबाला येथून बेपत्ता झाली होती. ती ऑगस्ट महिन्यापासून बेपत्ता होती. बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या कुटूंबियांनी तिचा शोध सुरु केला होता.(haryana-bajrangi-bhaijan-find-600-children)
पण त्या मुलीचा काही पत्ता लागला नव्हता. यानंतर त्या मुलीच्या कुटूंबाने हरियाणा पोलीस एएसआय राजेश कुमार यांची भेट घेतली. यांनी बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध घेण्यासाठी विनंती केली. हरियाणा पोलीस एएसआय राजेश कुमार यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वेगाने तपास सुरु केला. एएसआय राजेश कुमार यांनी बेपत्ता मुलीचा शोध घेऊन तिच्या कुटुंबियांसोबत भेट घडवून दिली.
ही दिव्यांग मुलगी ऑगस्ट महिन्यापासून अंबाला येथून बेपत्ता झाली होती. तेव्हापासून त्या मुलीचे कुटूंब तिचा शोध घेत होते, पण मुलगी काही सापडत नव्हती. शेवटी त्या दिव्यांग मुलीच्या कुटूंबाने हरियाणा पोलीस दलातील एएसआय राजेश कुमार यांची भेट घेतली आणि त्यांना मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.
एएसआय राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्यांग मुलीची आई तिची मुलगी हरवल्याची तक्रार घेऊन त्यांच्याकडे आली होती. मुलीच्या आईची अडचण पाहून राजेश कुमार यांनी तातडीने मुलीचा तपास सुरु केला. त्यानंतर एएसआय राजेश कुमार यांना मुलगी डेहराडून, उत्तराखंड येथे असल्याची माहिती मिळाली.
एएसआय राजेश कुमार यांनी तातडीने डेहराडून गाठले आणि त्या ठिकाणाहून दिव्यांग मुलीला ताब्यात घेतले. त्यानंतर एएसआय राजेश कुमार यांनी त्या मुलीला तिच्या कुटूंबियांकडे सोपवले. बेपत्ता झालेल्या मुलीला भेटून तिच्या कुटूंबियांना खूप आनंद झाला. त्या मुलीच्या कुटूंबियांनी एएसआय राजेश कुमार यांचे आभार मानले.
लीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी गेल्या 5 महिन्यांपासून बेपत्ता होती. मात्र अनेक ठिकाणी शोध घेऊनही ती सापडली नाही, त्यानंतर आज एएसआय राजेश कुमार यांनी आपल्या मुलीशी भेट करून दिली. एएसआय राजेश कुमार हरियाणात बजरंगी भाईजान म्हणून ओळखले जातात. हरियाणा पोलीस दलालातील एएसआय राजेश कुमार यांनी आतापर्यंत ६०० हून अधिक बेपत्ता मुलांचा शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांशी भेट करून दिली आहे.
महत्वाच्या बातम्या :-
..त्यामुळे अभिनय सोडून बॉबी देओलला करावे लागले नाईट क्लबमध्ये काम, कठीण काळात पत्नीने दिली साथ
“दाऊदच्या गुंडांपासून आनंद दिघेंना वाचवण्यासाठी तेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गाडी घुसवली होती”
‘नागिन’ फेम अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात; शाही विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर