इंडियन प्रीमियर लीग २०२२ सुरु असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघातील एका खेळाडूच्या बहिणीचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. आरसीबीचा स्टार वेगवान गोलंदाज हर्षल पटेलच्या बहिणीचे निधन झाले असून तो आयपीएल सोडून घरी परतला आहे. (harshal patel sister died)
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पटेलने बहिणीच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर स्पर्धा अर्धवट सोडली असून तो घरी परतला आहे. तो काही दिवस घरी राहून आल्यानंतर पुन्हा संघात सामीन होणार आहे. हर्षलच्या बहिणीचा शनिवारीच मृत्यू झाला होता. काही दिवसांपासून तिची प्रकृती ठीक नव्हती.
शनिवारीच मुंबई इंडियन्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर असा सामना खेळला गेला. यामध्ये विराट कोहलीच्या आरसीबी संघाने ७ विकेट्स राखून मुंबईवर विजय मिळवला. या सामन्यानंतर हर्षल पटेलला त्याच्या कुटुंबातील एका सदस्याचे निधन झाल्याची बातमी मिळाली. यानंतर तो थेट घरी गेला.
यंदाच्या आयपीएल सिजनमध्ये हर्षल पटेल दमदार कामगिरी करताना दिसून येत आहे. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली होती. या सामन्यात हर्षल पटेलने ४ षटकात २३ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी घेतले होते. सध्या तो घरी गेला असून पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी तो पुन्हा संघात परतेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
आयपीएलच्या एका सूत्राने सांगितले, दुर्दैवाने हर्षलला त्याच्या बहिणीच्या निधनामुळे बायो-बबल सोडावे लागले. त्याने पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी संघाची बस घेतली नाही. पुढील सामना खेळण्यासाठी तो पुन्हा संघात सामील होईल. पुढील सामना १२ एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे.
हर्षल पटेल परतल्यावर त्याला क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल, असे सांगण्यात आले आहे. यादरम्यान त्याची कोरोना चाचणीही होईल. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्याला बायो-बबलमध्ये पुन्हा प्रवेश मिळेल. पण जर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्याला संघात स्थान मिळणार नाही.
दरम्यान, हर्षल पटेल हा नेहमीच आरसीबीचा स्टार गोलंदाज राहिला आहे. चालू सिजनमध्ये त्याने ४ सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ६ विकेट घेतल्या आहेत. तर मागील सिजनमध्ये हर्षल पटेलने १५ सामन्यात सर्वाधिक म्हणजेच ३२ विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. त्याचवेळी आरसीबी संघाने या मोसमात आतापर्यंत ४ पैकी तीन सामने जिंकले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
…अन् महाराजांनी स्वत:च केला स्वत:चा अश्लील व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या नक्की काय घडलं
एकेकाळी शिक्षण घ्यायलाही नव्हते पैसे, आता आहे साऊथमधील महागडी अभिनेत्री; वाचा समंथाचा प्रवास
पहा राज ठाकरेंच्या नातवाची पहिली झकल; फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरल